आर्थिक

वडिलांशी भांडण झाले, आईकडून 10 हजार रुपये घेऊन सुरु केला कपड्याचा व्यवसाय, आज उन्हं केला वसंत फॅशनचा करोडोंचा व्यवसाय

Published by
Ahmednagarlive24 Office

देशातील श्रीमंत लोकांची यादी पाहिली तर यात 64 व्या क्रमांकावर आहेत रवी मोदी. वेदांत फॅशन, मान्‍यवर आदी मोठ्या ब्रँडचे ते मालक आहेत. त्यांच्या कंपनीची 32 हजार कोटी रुपयांचे व्हॅल्युएशन आहे. परंतु त्यांची येथपर्यंत येण्याची यशोगाथा मोठी आहे.

वडिलांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी आईकडून 10 हजार रुपये घेऊन व्यवसाय सुरु केला होता. आज त्यांचा व्यवसाय देशभर पसरला असून त्यांच्या कंपनीचं 32 हजार कोटी रुपयांचे भांडवल आहे. चला आपण आज त्यांची यशोगाथा जाणून घेऊयात –

फार मोठी रक्कम गुंतवून रवी यांनी व्यवसाय सुरू केला असे अजिबात नाही. आईने त्यांना 10,000 रुपये दिले होते. त्यातून त्यांनी या व्यवसायाची सुरवात केली. आज आपल्या मेहनत आणि कौशल्यामुळे रवी मोदी 28 हजार कोटींचे मालक आहेत. त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेतले नाही. व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नाची गुंतवणूक करून त्यांनी आपला व्यवसाय उभारला व वाढवत नेला. आज त्यांचा वेदांत फॅशन हा बिझनेस भारतात पसरला आहे.

या कंपनीचे देशभरात 600 पेक्षा जास्त स्टोअर आहेतच शिवाय 15 हून अधिक आंतरराष्ट्रीय स्टोअर देखील आहेत. फोर्ब्सनुसार, रवी मोदींची एकूण संपत्ती अंदाजे 28 हजार 321 कोटी रुपये आहे. रवी यांचे वडील कोलकात्यात कपड्याच्या दुकानात काम करायचे. शाळेतून आल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी रवी वडिलांना दुकानात मदत करायचा.

त्यांचे बी.कॉम मध्ये शिक्षण सुरु होते. ग्रॅज्युएशननंतर एमबीए करण्याचा त्यांचा विचार होता. पण वडिलांनी त्यास नकार दिला. त्यापेक्षा रवी यांनी व्यवसायात सहभागी व्हावे असे त्यांना वाटत होते. यावरून दोघांत भांडणे होऊ लागली. वडिलांशी भांडण झाल्यानंतर रवीने आईकडून दहा हजार रुपये घेऊन कपड्यांचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

त्यांनी आपल्या मुलाच्या नावावरून वेदांत असे आपल्या बिझनेसचे नाव ठेवले. त्यांनी बनवलेले कपडे लोकांना आवडू लागले. आवडायचे. त्यानंतर त्यांनी आपल्या कपड्यांना मान्यवर ब्रँड असे नाव दिले. वेदांत फॅशनचे पहिले स्टोअर ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये उघडण्यात आले. आज देशभरात त्यांची 600 हून अधिक स्टोअर्स आहेत.

वेदांत फॅशन हे आज खूप पुढे गेले आहे. त्यांनी 2016 मध्ये विराट कोहलीला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले. ते एवढ्यावरच नाही थांबले, त्यांनी अनुष्का शर्माला देखील ब्रँड अॅम्बेसेडर करत महिलांसाठी मोहे नावाचा ब्रँड सुरु केला. यानंतर त्वमेव आणि मंथन ब्रँड्सही लाँच करण्यात आले. अशा पद्धतीने रवी यांनी 10 हजारांत सुरु केलेल्या व्यवसायाला बळ मिळत गेले आणि आज हा करोडो रुपयांचा बिझनेस उभा राहिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office