Categories: आर्थिक

दिवाळीत खुशखबर ! ‘ह्या’ दिग्गज कंपनीत मिळणार नोकरीची सुवर्णसंधी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-हिंदुजा समूहाच्या बीपीओ शाखा हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन्स (एचजीएस) चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये ब्रिटेन, अमेरिका आणि भारत आदीसह विविध देशांत सुमारे 3200 लोकांना नोकरी देणार आहे.

एचजीएस ग्लोबलचे मुख्य वित्त अधिकारी श्रीनिवास पालकोडेती यांनी ही माहिती दिली. श्रीनिवास पलाकोडेट्टी म्हणाले की, वर्षाच्या उत्तरार्धात जवळपास 3200 लोकांना रोजगार मिळतील अशी आमची अपेक्षा आहे.

ऑर्डर उत्साहवर्धक दिसत आहेत. उदाहरणार्थ, यूकेमध्ये कोविड -19 संबंधित सरकारी खात्यांद्वारे आम्ही एक शाॅर्ट टर्म प्रोजेक्ट मिळविला होता.

आता आम्हाला आणखी एक मोठा प्रकल्प मिळाला आहे आणि आम्हाला आशा आहे की आणखी लोक भरती करावेत. ते म्हणाले की, कंपनी या नवीन ग्राहकांसाठी ब्रिटनमध्ये 700 कर्मचारी कामावर घेत आहे, जे घरून काम करतील.

अमेरिका, कॅनडा, जमैका, फिलिपिन्स आणि भारत या देशांतही भरती केली जाईल, असे पालकोडेती म्हणाले. सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीची भारतातील कामगार संख्या 39,578 इतकी होती जी एकूण कामगारांच्या 45 टक्के आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24