आर्थिक

तुम्हीपण बँकेत एफडी केली आहे ? रिझर्व बँकेने लागू केलाय ‘हा’ नियम, लगेच जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

FD Rule Change : आजकाल गुंतवणुकीचे महत्व सर्वानाच समजले आहे. पैसे गुंतवणूक केल्याने भविष्यात मिळणारे लाभ आता सर्वानाच कळले आहे. सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. यातील काही पर्याय अतिशय रिस्की असतात तर काही पर्यायांमध्ये अजिबात धोका नसतो.

कोणताही धोका न पत्करता सुरक्षित गुंतवणुकीसाठी ‘एफडी’ हाही एक पर्याय आहे. एफडी अंतर्गत लोकांना ठराविक व्याजदर उपलब्ध करून दिला जातो. आता आरबीआयने एफडीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे लोकांना महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. चला जाणून घेऊया त्याबद्दल…

RBI

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) म्हटले आहे की, बँकांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा द्यावी लागेल. सध्या ही मर्यादा 15 लाख रुपये आहे. रिझव् र्ह बँकेने एका परिपत्रकात म्हटले आहे की,

पुनरावलोकनानंतर, न काढता येण्याजोग्या एफडीसाठी किमान रक्कम 15 लाख रुपयांवरून 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ असा की व्यक्तींना 1 कोटी आणि त्याहून कमी रकमेच्या एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा असावी.

एफडी

तसेच सध्याच्या निकषांनुसार एफडीचा कालावधी आणि आकारानुसार वेगवेगळे व्याजदर देण्याचा पर्याय असून सध्या तरी त्यात मुदतीपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय नाही. परंतु आता नव्याने दिलेले हे निर्देश सर्व व्यापारी बँका आणि सहकारी बँकांना तात्काळ लागू आहेत.

दुसऱ्या परिपत्रकात रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी ‘बल्क डिपॉझिट’ची मर्यादा सध्याच्या 15 लाख रुपयांवरून 1 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक करण्यात आली आहे.

ग्राहकांची क्रेडिट माहिती

यासोबतच आरबीआयने सांगितले की, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना (सीआयसी) ग्राहकांची क्रेडिट माहिती दुरुस्त करण्यात उशीर झाल्यास त्यांना दररोज 100 रुपये भरपाई द्यावी लागेल. नवीन व्यवस्था लागू करण्यासाठी क्रेडिट संस्था (CI) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना (CIC) सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

नवीन निर्देशानुसार ग्राहकांना सुविधा

सध्या ग्राहकांना एफडीचा कालावधी पूर्ण होण्याआधी पैसे काढता येत नाहीत. परंतु आता वेळेच्या आधी लोकांना एफडीमधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office