आर्थिक

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! 55 महिन्यांच्या FD मध्ये 5 लाख जमा केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Published by
Tejas B Shelar

HDFC Bank FD News : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याजदर ऑफर करत आहे. त्यामुळे जर तुम्ही आगामी काळात फिक्स डिपॉझिट मध्ये तुमचा पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे.

फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एचडीएफसी बँकेचा पर्याय एक बेस्ट ऑप्शन आहे. कारण की एचडीएफसी कडून ग्राहकांना एफडी साठी चांगले व्याज दिले जात आहे. ही बँक 55 महिन्याच्या एफडीवर ग्राहकांना चांगला परतावा देत आहे.

यामुळे जर तुम्हीही चार-पाच वर्षांच्या एफडी मध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर एचडीएफसी बँकेचा पर्याय तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ठरणार आहे. दरम्यान, आता आपण याच एफडी योजनेची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे 55 महिन्यांची FD योजना ?

एचडीएफसी बँकेची 55 महिन्याची एफडी योजना सर्वाधिक परतावा देणारी योजना आहे. या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास ग्राहकांना 7.40% या दराने व्याज दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे हा रेट सामान्य ग्राहकांसाठी लागू आहे.

सिनिअर सिटीजन ग्राहकांना याच कालावधीच्या एफडीवर 0.50% अधिकच्या व्याज दराने परतावा दिला जात आहे. म्हणजे सिनिअर सिटीजन ग्राहकांना एचडीएफसी बँकेकडून 55 महिन्याच्या एफडी योजनेवर 7.90% या दराने व्याज दिले जात आहे.

55 महिन्याच्या एफडी मध्ये पाच लाखाची गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळणार ?

एचडीएफसी बँकेच्या या एफ डी योजनेत सामान्य ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटी वर सहा लाख 99 हजार 716 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एक लाख 99 हजार 716 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

जर समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत पाच लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना सात लाख पंधरा हजार 629 रुपये परत मिळणार आहेत. म्हणजेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना दोन लाख पंधरा हजार 629 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com