आर्थिक

Health Insurance: तुमच्यासाठी किती लाखांचा आरोग्य विमा फायदेशीर राहील? कसं ठरवाल? वाचा अतिशय महत्त्वाची माहिती

Published by
Ajay Patil

Health Insurance:- व्यक्तीचे आरोग्य ही एक खूप महत्त्वाची बाब असून आरोग्य ठणठणीत असणं हे यशस्वी जीवनासाठी खूप महत्त्वाचे असते. परंतु आरोग्याच्या जर काही समस्या उद्भवल्या तर मात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये असंख्य प्रकारच्या अडचणी सुरू होतात व सगळ्यात मोठी अडचण येते ती आर्थिक स्वरूपाचे होय.

कारण कुठल्याही प्रकारच्या शारीरिक आरोग्याची समस्या ही सांगून कधीच येत नसते. जर एकदाची आरोग्य समस्या उद्भवली तर वैद्यकीय खर्च हा मोठ्या प्रमाणावर होतो व तो कित्येकदा आपल्याला पेलणे कठीण जाते.

त्यामुळे अचानकपणे येणाऱ्या अशा आरोग्याच्या समस्येवर होणाऱ्या खर्चापासून वाचायचे असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणून जर आपण बघितले तर आरोग्य विमा हा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

परंतु आरोग्य विम्याच्या बाबतीत जर आपण बघितले तर विमा घेताना आपण किती रुपयांचा नेमका कव्हर घ्यावा? याबाबत बऱ्याचदा गोंधळ उडताना दिसतो. त्यामुळे आपण किती लाखाचा किंवा किती रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स कव्हर घ्यावा त्याबद्दलची थोडक्यात माहिती बघणार आहोत.

 या गोष्टींचा विचार करा आणि ठरवा किती रकमेची आरोग्य पॉलिसी घ्यावी?

1- आरोग्याच्या समस्या तुम्हाला जर आरोग्य विमा घ्यायचा असेल व तो किती रुपयांचा असावा हे ठरवण्याआधी तुम्ही तुमची आरोग्याची स्थिती पाहणे गरजेचे आहे. समजा तुम्ही तरुण आहात आणि तंदुरुस्त देखील आहात आणि तुमच्यात कुठल्याही प्रकारची आरोग्याची समस्या नसेल तर तुम्ही साधारणपणे बेसिक कव्हर सह योजना घेऊ शकतात.

परंतु जर मात्र तुम्हाला काही प्रकृतीच्या समस्या असतील किंवा आरोग्याची समस्या असेल तर मात्र तुम्ही सर्व समावेशक आरोग्य विमा घेणे कधीही चांगले आणि फायद्याचे ठरते.

2- स्वतःची आर्थिक परिस्थिती बघा इन्शुरन्स घेतला म्हणजे त्याचे हप्ते हे आलेच. हेल्थ इन्शुरन्सचे हप्ते हे बऱ्याचदा जास्त असतात व कधीकधी ते भरताना आपले आर्थिक बजेट कोलमडू शकते.तुम्ही जर जास्त कव्हर असलेला विमा प्लान घेतला तर त्याचा हप्ता देखील जास्त असतो.

अशावेळी जर तुमची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर मात्र कमी कवर असलेला विमा तुम्ही घेऊ शकतात. याकरिता आरोग्य विमा पॉलिसीची निवड करण्यापूर्वी त्याचा प्रीमियम तुम्ही सहजपणे भरू शकता का? या प्रश्नाचे उत्तर तपासणे गरजेचे आहे. त्यानुसार तुम्ही किती रुपयांचा विमा कव्हर घ्यावा हे ठरवू शकता.

3- तुमचे वय आणि जीवनशैली पहा तुमचे वय आणि तुमची लाईफस्टाईल कशी आहे यावर किती कव्हर तुमच्यासाठी फायद्याचा आणि योग्य राहू शकते हे ठरते. तरुणांसाठी कमी कवर असलेली पॉलिसी उत्तम असते.

परंतु तुमचे वय जर मात्र जास्त असेल तर तुम्ही जास्त कव्हर असलेली पॉलिसी घेणे फायद्याचे ठरते. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल व त्या ठिकाणी एखाद्या वेळेस शारीरिक इजा होण्याचा धोका असेल तर अशावेळी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेताना जास्त कव्हर असलेला घ्यावा.

4- तुमच्या कुटुंबाचा आरोग्य इतिहास तपासा डायबिटीस किंवा रक्तदाब म्हणजेच ब्लडप्रेशर सारखे जे काही आजार आहेत किंवा रोग आहेत ते अनुवंशिक आहेत.

एखाद्या व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास म्हणजेच एखादा व्यक्तीच्या आई वडील किंवा आजी आजोबा यांना डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर सारखे आजार असतील तर मात्र तुम्हाला या आजारांचा त्रास होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त कव्हर असलेली आरोग्य पॉलिसी घेणे आवश्यक आहे.

5- आरोग्य सेवांमधील महागाईचा विचार करा सध्या जर आपण वैद्यकीय खर्च पाहिले तर ते खूपच जास्त असल्यामुळे व प्रत्येक वर्षाला त्यांच्यामध्ये लक्षणीयरित्या वाढ होत राहिल्याने कोणत्याही आजारावर उपचार किंवा शस्त्रक्रियेचा खर्च पाच लाख रुपये असेल तर तो पुढच्या वर्षी सहा लाख पर्यंत येऊ शकतो.

अशा पद्धतीने सध्या वैद्यकीय खर्चामध्ये दरवर्षी वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे हेल्थ पॉलिसी घेताना एक किंवा दोन वर्षांनी जर तशी गरज पडली तर घेतलेले कव्हर अपूर्ण पडू नये या पद्धतीने आरोग्य विमा कव्हर घ्यावे.

Ajay Patil