RBI Rule About Cash : अलीकडे भारतात रोकड व्यवहारावर मोठे निर्बंध आले आहेत. रोकड अर्थातच कॅशने व्यवहार करण्याऐवजी आता ऑनलाईन व्यवहार अधिक होऊ लागले आहेत. शासनाने देखील डिजिटल इकॉनोमीला विशेष चालना दिली आहे. यामुळे देशात आता कॅशचा वापर कमी होऊ लागला आहे. प्रत्येक ठिकाणी आता यूपीआय पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून पेमेंट केले जाऊ लागले आहे.
फोन पे, पेटीएम, अमेझॉन पे, google पे यांसारख्या विविध डिजिटल पेमेंट अँप्लिकेशनच्या माध्यमातून एक क्युआर कोडं स्कॅन करून पेमेंट होऊ लागले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे व्यवहार आधीच्या तुलनेत अधिक पारदर्शी झाले आहेत. यामुळे आता खिशात पैसे ठेवण्याचीच गरज भासत नाही. निश्चितच ऑनलाइन पेमेंट हे सर्वसामान्यांसाठी फायदेशीरच आहे.
मात्र असे असले तरी अनेकदा काही व्यवहारांसाठी कॅशचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून भारतात एखादा व्यक्ती घरात किती कॅश ठेवू शकतो हा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण या संदर्भात भारतीय आयकर विभागाने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने काही नियम बनवले आहेत का याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आयकर विभागाचा नियम काय सांगतो
आयकर विभागाने घरात कॅश ठेवण्याबाबत कोणताही नियम तयार केलेला नाही. म्हणजेच तुम्ही घरात कितीही कॅश ठेवू शकणार आहात. यासाठी Income Tax विभागाने कोणतेच निर्बंध लावलेली नाहीत. भारतीय आयकर विभागाच्या नियमांनुसार, तुम्ही तुमच्या घरात कितीही रोकड ठेवू शकता, परंतु जर ती तपास यंत्रणेने पकडली तर तुम्हाला त्याचा स्रोत सांगावा लागेल.
जर तुम्ही ते पैसे कायदेशीररित्या कमावले असतील आणि त्याबाबतचे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील किंवा आयकर रिटर्न भरले असतील, तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही स्त्रोत सांगू शकत नसाल तर एजन्सी नक्कीच तुमच्यावर कारवाई करणार आहे. जर तुम्ही रोख रकमेचा हिशेब ठेवला नाही तर तुमच्या समस्या मात्र वाढू शकतात.
जर तुमच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. आणि तुम्ही त्या रोख पैशांची योग्य माहिती देऊ शकला नाहीत तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. आयकर कायद्यानुसार, तुमच्याकडून वसूल केलेल्या रोख रकमेच्या 137% पर्यंत कर आकारला जाऊ शकतो.
म्हणजे तुमच्याकडे असलेली सर्व कॅश तर जमा होईलच शिवाय वरून तुम्हाला ३७ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. त्यामुळे घरात कितीही कॅश ठेवली तरी प्रॉब्लेम येत नाही मात्र त्या कॅशचे स्रोत तुम्हाला सांगता आले पाहिजेत. त्याबाबतचे कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही जर योग्य मार्गाने कॅश कमावलेली असेल आणि तुमच्याकडे त्याबाबतची सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही घरात करोडो रुपये ठेवू शकता.