FD Interest Rates : जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे मुदत ठेव. तसेच सध्या अनेक बँका मुदत ठेवींवर जबरदस्त परतावा देखील देत आहेत.
मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्याने, ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर हमी उत्पन्न मिळते. अशा परिस्थितीत, बँकांव्यतिरिक्त, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) देखील त्यांच्या ग्राहकांना FD वर बंपर व्याज देत आहेत. आज आपण अशा 3 नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांबद्दल जाणून घेऊया घेणार आहोत ज्या ग्राहकांना FD वर 9 टक्के पेक्षा जास्त व्याज देत आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1001 दिवसांच्या FD वर 9 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्याच कालावधीसाठी 9.50 टक्के व्याज देत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1000 दिवसांच्या FD वर 8.51 टक्के व्याज देत आहे. तर बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना याच कालावधीसाठी 9.11 टक्के व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 9.10 टक्के व्याज देत आहे. तर बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्याच कालावधीसाठी 9.60 टक्के पर्यंत व्याज देत आहे.