अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- ह्युन्दाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युन्दाई अहमदनगर येथे नवीन “दि ऑल न्यू आय-२०” चे प्रक्षेपण दिनांक ०५ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आले.
फर्स्ट कनेक्टेड प्रीमियम कार उत्पादित ह्युंदाई ही आद्यप्रवर्तक कंपनी ठरली आहे. सदर “दि ऑल न्यू आय-२०” व्हेईकल ४ व्हेरीएंट व ८ आकर्षक रंगात आहे.
सदर गाडीत १.२ली. पेट्रोल इंजिन (बेस्ट ईन सेगमेंट), आय.व्ही.टी., आय.एम.टी.(फर्स्ट ईन सेगमेंट), ७ स्पीड डी.सी.टी. (फर्स्ट ईन सेगमेंट) व १,५ यु२ सी.आर.डी.आय.डिझेल इंजिन (बेस्ट ईन सेगमेंट) इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.
अत्यंत वाजवी दरात ग्राहकांना ह्या सेगमेंट मध्ये असलेल्या खालील उत्कृष्ठ सुविधांचा लाभ मिळणार आहे की ज्या सुविधा इतर कंपन्यांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध नाहीत
सदर गाडीची एक्स शोरूम किमत उपलब्ध व्हेरीएंट नुसार रु. ६.८० लाख पासून रु १०.६० लाख पर्यंत आहे. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना नामवंत बँका व फायनान्स कंपन्यांकडून झीरो प्रोसेसिंग फी १००% ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहे.
दररोज ग्राहकांचा बुकिंगसाठी उदंड प्रतिसाद वाढत आहे. सदर गाडी इलाक्षी ह्युन्दाई अहमदनगर येथे डेमो व टेस्ट ड्राईव्ह साठी उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन इलाक्षी ह्युन्दाईचे जनरल मॅनेजर श्री. राजू बेजगमवार यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved