अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- हुंदाई मोटर इंडियाने त्यांच्या प्रीमियम हॅचबॅक i20 (Premium Hatchback i20) लाँचिंगच्या केवळ 40 दिवसांमध्ये तब्बल 30 हजार कार्सचं बुकिंग केलं आहे.
ह्युंदाई कंपनीने भारतीय बाजारात 5 नोव्हेंबरला नवीन आय 20 लाँच केली होती. नवीन आय 20 च्या लूकमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. जे ग्राहकांना खूपच पसंत पडत आहेत. यामुळे या कार खरेदीकडे ग्राहकांचा कल जास्त वाढलेला दिसून आला आहे.
ग्राहकांसाठी तीन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार कार :- Hyundai Premium Hatchback i20 एकूण तीन इंजिन पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. याच्या एका वेरिएंटमध्ये 1.5 लीटर क्षमतेच्या CRDi डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. तर पेट्रोल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.2 लीटर कप्पा आणि 1.0 लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजन दिलं आहे.
ही कार 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (iMT) आणि 7 स्पीड डीसीटी ऑटोमेटिक गियरबॉक्ससह (AT) उपलब्ध करण्यात आली आहे. मायलेजबद्दल बोलताना कंपनीचा असा दावा आहे की, ही कार 20 ते 25 किलोमीटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.
जाणून घ्या किंमतीबाबत :- शानदार लूक आणि जबरदस्त फीचर्स असलेलं थर्ड जनरेशन Hyundai i20 ची किंमत भारतात 6.79 लाखांमध्ये लाँच करण्यात आली असून याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 11.32 लाख रुपये आहे.