SIP Investment Plan : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदाराकडे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी जिथे गुंतवणूकदार बँकेची एफडी, पोस्ट ऑफिस, एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत आहेत. तर दुसरीकडे अधिकच्या परताव्यासाठी गुंतवणूकदार शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील एसआयपी सारख्या योजनांकडे आकर्षित होत आहेत.
खरे तर म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपेक्षा तुलनेने कमी रिस्की आहे. मात्र म्युच्युअल फंड देखील शेअर बाजाराशी संबंधित असतात. त्यामुळे या ठिकाणी जोखीम नाहीच असं म्हणता येणार नाही. शेअर बाजाराशी संलग्न असल्याने म्युच्युअल फंडमध्ये देखील जोखीम असतेचं मात्र जोखीमेचे प्रमाण हे तुलनेने कमी आहे.
मात्र म्युच्युअल फंडमधून एफ डी, पोस्ट ऑफिस आणि एलआयसी बचत योजनांपेक्षा अधिक परतावा मिळत असल्याने अलीकडे अनेक लोक यामध्ये गुंतवणूक करत आहेत. दरम्यान एसआयपी करू इच्छिणाऱ्या अनेक लोकांच्या माध्यमातून जर एसआयपी मध्ये पाच वर्षांसाठी चार हजार रुपयांची गुंतवणूक केली तर किती फंड तयार होईल याबाबत विचारणा केली जात होती. अशा परिस्थितीत आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती फंड तयार होणार
गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. याचे कारण म्हणजे म्युच्युअल फंड मधून जोरदार रिटर्न आता गुंतवणूकदारांना मिळू लागले आहेत. अनेकांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न मिळवले आहेत. मात्र म्युच्युअल फंड मधून मिळणारे रिटर्न हे शेअर बाजाराशी संबंधित असल्याने यावर फिक्स रिटर्न मिळत नाहीत.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार 2023 मध्ये अनेक स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंड योजनांनी गुंतवणूकदारांना 50% पर्यंतचे रिटर्न दिले आहेत. हे रिटर्न शॉर्ट टर्म मध्ये आहेत. तज्ञ लोक सांगतात की जर एखाद्या स्मॉल कॅप फंड मध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना 30% पर्यंतचे रिटर्न सहजतेने मिळू शकतात.
अशा परिस्थितीत जर एखाद्या स्मॉल कॅप फंडमध्ये दरमहा 4000 रुपये एसआयपी केली तर गुंतवणूकदाराला पाच वर्षानंतर चांगला बंपर परतावा मिळू शकतो. चार हजार रुपयाची एसआयपी केली तर पाच वर्षात दोन लाख 40 हजार रुपये एवढी गुंतवणूक होईल. जर या गुंतवणुकीवर 30 टक्के रिटर्न मिळालेत तर पाच वर्षानंतर पाच लाख 57,566 रुपयांचा मोठा फंड जमा होऊ शकणार आहे.