Axis Bank FD : तुम्ही ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत, ज्याअंतर्गत आता तुम्हाला तुमच्या एफडीवर वाढीव व्याज मिळतील.
बँकेच्या वेबसाइटनुसार 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या एफडीसाठी सुधारित दर लागू आहेत. ॲक्सिस बँक सध्या सामान्य नागरिकांना 7.20 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देत आहे. सध्या बँक कोणत्या कालावधीसाठी किती व्याज देत आहे पाहूया…
ॲक्सिस बँकेने सर्वसाधारण नागरिकांसाठी 17 महिन्यांपासून 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील मुदत ठेव व्याज दर 7.10 टक्के वरून 7.20 टक्के पर्यंत 10 बेस पॉइंट्स (bps) ने वाढवला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँकेने ते 7.75 टक्के वरून 7.85 टक्के केले आहे.
Axis Bank चे नवीन FD व्याज दर
Axis Bank 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर सर्वसामान्य नागरिकांसाठी 3टक्के ते 7.10 टक्के दरम्यान व्याजदर ऑफर करते.
बँक 7 ते 29 दिवसांच्या FD वर 3 टक्के व्याज दर ऑफर करते. तर 30 ते 45 दिवसात देय असलेल्या FD वर 3.5 टक्के व्याज दर ऑफर करते. 46 ते 60 दिवस आणि 3 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर तुम्हाला 4.25 टक्के व्याज मिळेल.
तीन महिने ते 25 दिवस आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.75 टक्के व्याजदर देते. ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांना नऊ महिने ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदतीच्या FD वर 6 टक्के व्याजदर मिळेल. एक वर्ष आणि 15 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.70 टक्के व्याजदर मिळेल.
15 महिने ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत परिपक्वता असलेल्या FD साठी, बँक 7.1 टक्के व्याज दर देते. 17 महिन्यांपासून ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी, बँकेने ते 7.10 टक्के वरून 7.20 टक्के केले आहे. बँक पाच वर्ष ते 10 वर्षांच्या दरम्यानच्या FD वर 7 टक्के व्याज दर देते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी दर
ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा 0.75 टक्के पर्यंत अतिरिक्त व्याजदर मिळतो. Axis Bank 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.8 टक्के ते 7.85 टक्के दरम्यान व्याजदर ऑफर करते.