आर्थिक

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर वाचा ही बातमी, गुंतवणूकदारांना होणार फायदा !

Published by
Ahmednagarlive24 Office

Bank of Baroda : जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने एक नवीन स्कीम आणली आहे, ज्याअंतर्गत गुंतवणूकदारांना भरपूर फायदा होणार आहे. बँकेने कोणती स्कीम आणली आहे, आणि गुंतवणूकदारांना याचा कसा फायदा होणार आहे जाणून घेऊया…

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने एक विशेष अल्पकालीन मुदत ठेव योजना सुरू केली आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कमी वेळेत चांगला परतावा मिळू शकतो. या एफडी योजनेअंतर्गत बँक तुम्हाला 7.60 टक्के व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदाच्या या मुदत ठेव योजनेशी संबंधित काही खास गोष्टी पुढीलप्रमाणे :-

या विशेष FD योजनेला BoB 360 असे नाव देण्यात आले आहे. माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाच्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त व्याज देणाऱ्या एफडी योजनांपैकी ही एक आहे. नावाप्रमाणेच तुम्हाला यामध्ये 360 दिवसांच्या म्हणजेच 1 वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागेल.

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, BoB 360 FD योजनेअंतर्गत तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तर कमाल गुंतवणूक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असू शकते. यामध्ये तुम्हाला नॉमिनेशनची सुविधाही देण्यात आली आहे. यासोबतच ऑटो रिन्यूअलचा पर्यायही उपलब्ध आहे.

किती टक्के व्याज मिळेल :-

-या एफडी योजनेअंतर्गत बँक सर्वसामान्यांसाठी 7.10 टक्के आणि वृद्धांसाठी 7.60 टक्के दराने व्याज देत आहे.

-एफडी ऑनलाइन किंवा मोबाइल ॲपच्या मदतीने उघडता येते.

बँकेचे विद्यमान आणि नवीन ग्राहक ‘BOB360’ नावाची ही ठेव योजना ऑनलाइन किंवा मोबाईल ॲपच्या मदतीने कोणत्याही शाखेत उघडू शकतात. तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन या योजनेशी संबंधित अधिक माहिती मिळवू शकता.

Ahmednagarlive24 Office