आर्थिक

SBI Scheme: एसबीआयच्या ‘या’ योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला मिळेल तुम्हाला 29,349 रुपये निश्चित उत्पन्न! वाचा कसे?

Published by
Ajay Patil

SBI Scheme:- आपण कमावलेले पैशांची बचत करतो व अनेक योजनांमध्ये त्या बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करतो. ही केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यकालीन आर्थिक बाजू भक्कम किंवा मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

याकरिता आपण अनेक गुंतवणूक योजनांचा पर्याय वापरतो व या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतो. यामध्ये बरेच जण विविध बँकांच्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अगदी याच पद्धतीने जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया चा विचार केला तर ही देशातील सर्वात मोठी बँक असून या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांकरिता अनेक नवीन प्रकारच्या योजना आणल्या जातात.

अशाच एसबीआयच्या काही योजनांपैकी जर आपण एसबीआय वार्षिक ठेव योजनेचा विचार केला तर ही योजना देखील पैसे गुंतवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या योजनेचे वैशिष्ट्य असे आहे की तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवले की प्रत्येक महिन्याला तुम्हाला निश्चित उत्पन्न मिळत असते. याच योजनेविषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.

 काय आहे नेमकी स्टेट बँक ऑफ इंडियाची वार्षिक ठेव योजना?

 एसबीआय एनयूटी स्कीम म्हणजेच एसबीआय वार्षिक ठेव योजना ही एक महत्त्वाची योजना असून यामध्ये तुम्ही एकरकमी रक्कम गुंतवणूक गरजेचे असते. साधारणपणे यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच पैसे गुंतवावे लागतात

व त्या बदल्यांमध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम दिली  जाते. या योजनेमध्ये तुम्हाला 6.50% ते 7.50% पर्यंत व्याजदर मिळतो. समजा तुम्ही जर या फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला मार्च महिन्यापासून पैसे मिळायला सुरुवात होते.

 या योजनेसाठी पात्रता

1- कोणताही भारतीय नागरिक या योजनेत पैसे गुंतवू शकतो.

2- योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वयोमर्यादेचे बंधन नाही.

3- योजनेमध्ये तुम्ही वैयक्तिक म्हणजेच एकल किंवा संयुक्त खाते देखील उघडू शकतात.

 या योजनेचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये

 तुम्ही जर या एसबीआयच्या या योजनेमध्ये पैसे गुंतवले तर बचत खात्याच्या तुलनेमध्ये या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर जास्त व्याज मिळते.

या योजनेत तुम्हाला मुदत ठेवी प्रमाणे व्याजदर मिळतो. विशेष म्हणजे या योजनेत संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला समान व्याजदर मिळतो. म्हणजेच खाते उघडताना तुम्हाला जो व्याजदर मिळेल तोच तुम्हाला या योजनेचा संपूर्ण कालावधीमध्ये मिळतो.

 किती पैसे गुंतवले तर किती मिळतील प्रत्येक महिन्याला पैसे?

 समजा या योजनेमध्ये तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 6.5% या व्याजदरानुसार प्रत्येक महिन्याला पाच वर्षांकरिता 29 हजार 349 रुपये मिळतात. जर तुम्ही या योजनेत दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच वर्षांकरिता प्रत्येक महिन्याला 19 हजार 56 रुपये मिळतात.

म्हणजेच तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवाल तितके पैसे तुम्हाला दर महिन्याला व्याजानुसार दिले जातात.महत्त्वाचे म्हणजे या योजनेत तुम्ही तीन, पाच आणि सात किंवा दहा वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतात.

यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार योजनेची निवड करू शकतात. एवढेच नाही तर तुम्ही कमीत कमी या योजनेत एक हजार रुपये जमा करू शकतात

आणि गुंतवणूक करण्याची यामध्ये कमाल मर्यादा नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत अर्ज करू शकतात. एवढेच नाही तर तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जासाठी देखील अर्ज करू शकतात.

Ajay Patil