Post Office Investment : दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक…

Content Team
Published:
Post Office Investment

Post Office Investment : जर तुम्ही सध्या दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची आहे. आम्ही आज पोस्टाच्या अशाच एका खास योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दीर्घ मुदतीत मालामाल होऊ शकता.

येथे आम्ही तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF बद्दल सांगत आहोत. ही योजना 15 वर्षांनी परिपक्व होते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात आणखी पाच वर्ष वाढ करू शकता. तुम्ही पीपीएफमध्ये वार्षिक कमाल 1.5 रुपये म्हणजेच महिन्याला 12,500 जमा करू शकता. जर तुम्ही ही रक्कम सतत दीर्घकाळ जमा करत राहिलात तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेद्वारे तुम्ही करोडपती बनू शकता.

सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. याशिवाय या योजनेचा एक फायदा म्हणजे त्यात जमा केलेले पैसे, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. म्हणजे ते EEE श्रेणीत ठेवले आहे. जर तुम्ही या योजनेत 25 वर्षे सतत गुंतवणूक करत राहिल्यास तुम्ही स्वतःला सहजपणे करोडपती बनवू शकता. 25 वर्षे गुंतवणूक सुरू ठेवण्यासाठी, 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये किमान दोनदा वाढवावी लागेल. म्हणजे 15 वर्ष पूर्ण झाल्या नंतर दोनदा 5-5 वर्ष वाढवावी लागतील.

यामध्ये तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केले आणि 25 वर्षे सतत जमा केले तर तुम्ही 25 वर्षांत करोडपती व्हाल. PPF कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही 25 वर्षांत 37,50,000 रुपयांची गुंतवणूक कराल. ७.१ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 65,58,015 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे, तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळालेल्या व्याजाच्या रकमेसह 25 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1,03,08,015 रुपये मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe