आर्थिक

LIC Policy Loan: तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी आहे व तुम्हाला पैशांची गरज आहे का? सोप्या पद्धतीने घेऊ शकता एलआयसी पॉलिसीवर कर्ज

Published by
Ajay Patil

LIC Policy Loan:- जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचदा अनपेक्षितपणे अचानक पैशांची गरज भासते व लागणारा पैसा आपल्याकडे पुरेशा प्रमाणात नसतो. अशावेळी आपण वेगवेगळ्या पद्धतीतून पैसा उभा करण्यासाठी प्रयत्न करतो व प्रामुख्याने  कर्जासाठी विविध बँक किंवा वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी अर्ज करतो.

परंतु या व्यतिरिक्त भारतीय आयुर्विमा  महामंडळ अर्थात एलआयसीच्या माध्यमातून देखील तुम्ही कर्ज घेऊ शकतात. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एलआयसी पॉलिसी घेतलेली असते व तुमच्याकडे देखील जर एलआयसी पॉलिसी असेल तर एलआयसी ही पॉलिसी धारकाला विम्याचा लाभ तर देतेच परंतु त्यासोबत कर्जाची सुविधा देखील पुरवते.

आर्थिक अडचणीच्या कालावधीत तुम्ही एलआयसी पॉलिसी अंतर्गत कर्ज देखील घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे जर तुम्ही इतर ठिकाणाहून पर्सनल लोन घेतले तर त्या तुलनेत एलआयसीकडून घेतलेल्या कर्जावर तुम्हाला कमीत कमी व्याज लागते. नेमके एलआयसी पॉलिसी वर कर्ज कसे घेता येते व त्याचे नियम काय आहेत? याबाबतची माहिती या लेखात घेऊ.

 एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठीचे महत्वाचे नियम

1- तुम्हाला एलआयसी पॉलिसीवर कर्ज घ्यायचे असेल तर ते फक्त ट्रॅडिशनल आणि एंडोमेंट पॉलिसीच्या माध्यमातून दिले जाते.

2- तसेच तुम्हाला दिले जाणाऱ्या कर्जाची रक्कम ही एलआयसी पॉलिसीचे सरेंडर मूल्य किती आहे त्यावर ठरत असते. म्हणजेच पॉलिसीच्या एकूण सरेंडर मूल्याचे 80 ते 90% पर्यंत कर्ज मिळते.

3- एलआयसी पॉलिसी वर देण्यात आलेल्या कर्जावरील व्याजदर हा 10 ते 12 टक्क्यांपर्यंत असतो. परंतु बऱ्याचदा पॉलिसीधारकांची प्रोफाइल कशी आहे यावर देखील अवलंबून असतो.

4- जेव्हा पॉलिसीधारक एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेतो तेव्हा कंपनी त्याची पॉलिसी गहाण ठेवत असते.

5- समजा तुम्ही पॉलिसीवर कर्ज घेतले व परतफेड करण्यापूर्वीच तुमची पॉलिसी कालावधी संपला म्हणजेच ती परिपक्व झाल्यास कंपनी घेतलेल्या कर्जाची रक्कम पॉलिसीचे एकूण रकमेतून कापून घेते.

 एलआयसी पॉलिसीवर कर्जासाठी कसा कराल अर्ज?

 तुम्हाला देखील तुमच्याकडे असलेल्या एलआयसी पॉलिसीवर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने याकरिता अर्ज करू शकता.

त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन एलआयसीच्या ई सेवामध्ये नोंदणी करावी लागेल व तुमच्या खात्यात लॉग इन केल्यानंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकतात.

 ऑफलाइन पद्धतीने..

 आपल्या पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या एलआयसी कार्यालयामध्ये जावे लागते व ऑफलाईन कर्जासाठी अर्ज करण्याकरता तुम्हाला केवायसी कागदपत्रे सोबत न्यावे लागतात.

Ajay Patil