आर्थिक

सोन्यात गुंतवणूक करून कमवायचा असेल पैसा तर करा गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक! गेल्या 1 वर्षात दिला 25 टक्के पर्यंत परतावा, वाचा कशी कराल गुंतवणूक?

Published by
Ajay Patil

गुंतवणूक आणि भविष्यातील सुखी आयुष्य हे एकमेकांशी निगडित आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आपण जो काही पैसा कमवतो त्या पैशांची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी केली तरच तो पैसा वाढू शकतो व भविष्य काळामध्ये मोठा फंड तयार करून आपण चांगला पैसा जमा करू शकतो.

आपण चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू तेव्हा आपल्याला परतावा देखील चांगला मिळतो व आपण आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतो. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत व त्यातील एक सगळ्यात महत्त्वाचा व सर्वांच्या पसंतीचा पर्याय म्हणजे सोन्यातील गुंतवणूक हा होय.

त्यामध्ये बऱ्याचदा सोने खरेदी म्हणजेच दागिन्याचे खरेदी करून बरेच जण सोन्यात गुंतवणूक करतात व ही पद्धत अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. परंतु आता या डिजिटल युगामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील सोन्यात गुंतवणूक करू शकतात व चांगला पैसा कमवू शकतात.

जर आपण गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफच्या दृष्टिकोनातून बघितले तर हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय असून एक वर्षात 25% पर्यंत परतावा ईटीएफच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

 गोल्ड ईटीएफचे स्वरूप कसे असते?

गोल्ड ईटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड हा सोन्याच्या वाढलेल्या व घसरलेल्या किमतीवर आधारित असतो. जर आपण याचे प्रमाण पाहिले तर एक गोल्ड ईटीएफ युनिट जर तुम्ही खरेदी केला तर तुम्ही एक ग्रॅम सोने खरेदी करतात. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे एक ग्रॅम सोने होय.

तुम्ही गोल्ड ईटीएफ  बीएसई आणि एनएसई सारख्या शेअर्सवर खरेदी आणि विक्री देखील करू शकता. परंतु यामध्ये तुम्हाला भौतिक सोने मिळत नाही. यामधून जर तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला सोन्याच्या किमती इतके पैसे मिळतात.

 गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक कराल तर मिळतील हे फायदे

1- कमीत कमी प्रमाणात सोने खरेदी करण्याची मुभा आपण जसे पाहिले की ईटीएफच्या माध्यमातून तुम्ही युनिटमध्ये सोन्याची खरेदी करू शकता. या ठिकाणी एक युनिट म्हणजेच एक ग्रॅम सोने असे प्रमाण असते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात सोने खरेदी करणे सोपे होते.

2- शुद्ध सोने मिळवा गोल्ड ईटीएफची किंमत पारदर्शक आणि सारखी असते व हे मौल्यवान धातूंवरील जागतिक प्राधिकरण असलेल्या लंडन बुलियन मार्केट असोसिएशनचे अनुसरण करत असते. वेगवेगळे ज्वेलर्स वेगवेगळ्या किमतींवर प्रत्यक्ष सोने देऊ शकतात. गोल्ड ईटीएफ द्वारे खरेदी केलेले सोने 99.5% शुद्ध असते व त्या प्रकारचे हमी देते व ती शुद्धतेची उच्च पातळी असते. तुम्ही जे काही सोने खरेदी करतात त्याची किंमत ते किती शुद्ध आहे त्यावर आधारित असेल.

3- कुठल्याही प्रकारचा मेकिंग चार्जेस नाही तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी एक टक्के वार्षिक शुल्कासह गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी एक टक्के किंवा त्यापेक्षा कमी ब्रोकरेज आकारला जातो. याची तुलना जर आपण नाणी किंवा बार खरेदी करण्यासाठी ज्वेलर्स किंवा बँकांच्या माध्यमातून द्यावा लागणारे आठ ते 30 टक्के मेकिंग चार्जेच्या तुलनेत पाहिले तर हे प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजेच मेकिंग चार्जेसचा खर्च वाचतो.

4- आरामात खरेदी आणि विक्री करता येते गोल्ड ईटीएफ तुम्ही कुठल्याही त्रासाशिवाय अगदी सहजरित्या खरेदी करू शकतात आणि त्याला विकू शकतात. तसेच गोल्ड ईटीएफचा वापर तुम्ही कर्ज घेण्यासाठी सुरक्षा म्हणून देखील करू शकतात व कर्ज घेऊ शकतात.

 गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक कशी करू शकता?

तुम्हाला जर गोल्ड ईटीएफ खरेदी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या ब्रोकर मार्फत डिमॅट खाते उघडावे लागते. यात तुम्ही एनएसई वर उपलब्ध गोल्ड ईटीएफचे युनिट खरेदी करू शकता आणि तुमच्या डिमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून  तितकीच रक्कम खरेदीसाठी कट केली जाते. तुमच्या डिमॅट खात्यात ऑर्डर दिल्यानंतर साधारणपणे दोन दिवसांनी गोल्ड ईटीएफ जमा केले जातात. या गोल्ड ईटीएफची विक्री तुम्हाला करायचे असेल तर तुम्हाला ट्रेडिंग खात्याच्या माध्यमातून करावी लागते.

Ajay Patil