Fixed Deposit Scheme:- प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये जेव्हा पैसे कमवतो आणि त्या पैशांची बचत करून गुंतवणूक करतो तेव्हा सगळ्यात आधी विचार करतो तो गुंतवणुकीची सुरक्षितता आणि त्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज म्हणजेच परतावा होय.
गुंतवणुकीच्या ज्या योजना किंवा पर्यायांमध्ये गुंतवणुकीची सुरक्षिततेची हमी देखील असते आणि परतावा देखील जास्त मिळतो अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याला गुंतवणूकदार प्राधान्य देत असतात. अशा पर्यायांचा विचार करत असताना बरेच व्यक्ती म्युच्युअल फंड एसआयपी तसेच अनेक सरकारी योजना,
पोस्ट खात्याच्या बचत योजना आणि बँकांमधील मुदत ठेव योजना यासारख्या गुंतवणूक पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. यामध्ये जर आपण मुदत ठेव योजनांचा विचार केला तर बहुतेक गुंतवणूकदार हे बँकांमधील मुदत ठेव योजनांना पसंती देतात.
परंतु या व्यतिरिक्त जर आपण पाहिले तर अशा काही नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आहेत ज्या बँकांपेक्षा जास्तीचे व्याज मुदत ठेवींवर देतात. साधारणपणे या योजनांमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला आठ टक्के पेक्षा जास्त व्याज मिळते.
साधारणपणे आपल्याला माहित आहे की जर आपण बँकेमध्ये एफडी केली तर सहा ते सात टक्के दराने व्याज मिळते. परंतु अशा काही एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग वित्तीय संस्था आहेत की ज्यामध्ये तुम्हाला मुदत ठेवीवर सात ते 8.6 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो.
त्यामुळे साहजिकच तुम्ही अशा ठिकाणी मुदत ठेव केली तर तुमची एकरकमी रक्कम जमा होऊ शकते व तुम्ही सहजपणे चांगली कमाई करू शकतात.
या एनबीएफसीमध्ये मुदत ठेवींवर मिळते बँकांपेक्षा जास्त व्याज
1- श्रीराम फायनान्स- श्रीराम फायनान्स कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला मुदत ठेवींवर 7.8 ते 8.6% व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये तुम्ही एक वर्षासाठी पैसे जमा केल्यास तुम्हाला 7.8 टक्के दराने व्याज मिळते.
18 महिन्यांच्या कालावधी करिता 7.95% व्याजदर आहे. जर तुम्ही श्रीराम फायनान्स मध्ये तीस महिन्यांची एफडी केली असेल तर तुम्हाला 8.30 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. या व्यतिरिक्त जर तुम्ही 50 आणि 60 महिन्यांची एफडी केली तर तुम्हाला 8.6 टक्के दराने व्याज मिळते.
2- बजाज फिन्सर्व- बजाज फिन्सर्वच्या माध्यमातून 42 महिन्यांची विशेष मुदत ठेव योजना जारी करण्यात आलेली असून यावर तुम्हाला वार्षिक आधारावर 8.6% व्याज दिले जाते. बजाज फिन्सर्वच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन मुदत ठेव योजनेचा पर्याय देखील दिला जातो.
यामध्ये तुम्ही 44 महिन्यांकरिता एफडी केल्यास तुम्हाला वार्षिक 8.35% व्याज दिले जाते. तसेच पंधरा महिन्याच्या एफडीवर तुम्हाला कमीत कमी 7.45% दराने व्याज दिले जाते.
3- महिंद्रा फायनान्स– तसेच महिंद्रा फायनान्स तुम्हाला मुदत ठेव योजनांवर 7.75 ते 8.5% इतके व्याज देत आहे. महिंद्रा फायनान्स 42 महिन्यांच्या एफडीवर ८.५ टक्के व्याज देते व जर तुम्ही 15 महिन्यांच्या मुदतीत मुदत ठेव केली तर तुम्हाला 7.75 टक्के इतका परतावा मिळतो.
4- मुथूट फिनकॉर्प– या ठिकाणी तुम्हाला तीन वर्ष पर्यंत मुदत ठेव योजनेवर साधारणपणे 8.5% पर्यंत व्याज मिळते तर सर्वात कमी व्याजदर 7.4% आहे.
अशा पद्धतीने तुम्ही बँकांव्यतिरिक्त जर अशा ठिकाणी पैसे गुंतवले तर तुम्हाला चांगला व्याजदराचा फायदा मिळून चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.