आर्थिक

तुम्हाला देखील तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर सरकारची ‘ही’ योजना येईल कामाला! फक्त एवढे दिवस करावी लागेल गुंतवणूक

Published by
Ajay Patil

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक गुंतवणुकीचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. परंतु उपलब्ध असलेल्या या पर्यायांपैकी ज्या पर्यायामधून गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा येईल आणि गुंतवणूक देखील सुरक्षित राहील अशा पर्यायांची निवड गुंतवणूकदारांकडून केली जाते.

कारण यामध्ये गुंतवणुकीची परताव्याची हमी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या दोन्ही दृष्टिकोनातून गुंतवणुकीसाठी बँक तसेच पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य दिले जाते. कारण यामध्ये तुम्हाला निश्चित परतावा मिळतो आणि गुंतवणुकीची देखील कुठलाही प्रकारे काळजी नसते.

त्यामुळे सरकारी योजनांना जास्त महत्त्व दिले जाते. या अनुषंगाने जर आपण पोस्ट ऑफिसच्या योजना बघितल्या तर यामध्ये आपल्याला गॅरंटेड असा परतावा मिळतो व गुंतवणूक देखील सुरक्षित राहते.

पोस्ट ऑफिसच्या ज्या काही उपलब्ध योजना आहेत त्यामधील जर आपण एका महत्त्वाच्या योजनेची माहिती घेतली तरी ही योजना तुम्ही गुंतवलेले पैसे दुप्पट करण्यास तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते व अशा पद्धतीने रक्कम दुप्पट करण्याची हमी खुद्द सरकारच्या माध्यमातून घेतली जाते.

 पोस्ट ऑफिसची योजना करेल पैसे दुप्पट

पोस्ट ऑफिसच्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्यामधील सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना होय. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला गॅरेंटेड असा परतावा तर मिळतोच परंतु पैशांची हमी देखील सरकार घेत असतो.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर हमखास परतावा मिळतो व कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करायला पात्र आहे. तसंच किसान विकास पत्र योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खाते खोलणे खूपच सोपे आहे. पैसे दुप्पट करण्याची हमी सरकारच्या माध्यमातून दिली जाते.

समजा तुम्ही या योजनेमध्ये जर पाच लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला दहा लाख रुपये मिळतात. परंतु याप्रकारे जर तुम्हाला दुप्पट परतावा मिळवायचा असेल तर मात्र या योजनेच्या अटी पाळणे देखील तितकेच गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही या अटी पूर्ण कराल तेव्हाच तुम्हाला या योजनेचा फायदा मिळू शकतो.

यातील सगळ्यात महत्त्वाचे अट म्हणजे तुम्हाला जर किसान विकास पत्र योजनेतून दुप्पट परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम नऊ वर्ष सात महिने म्हणजेच 115 महिन्यांसाठी गुंतवणे गरजेचे आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे तुमचे हे पैसे 115 महिन्यांनी दुप्पट होतात व या योजनेमध्ये तुम्ही जी गुंतवणूक कराल त्या गुंतवणुकीवर 7.5% दराने परतावा देखील मिळतो.

 खाते कोणाला उघडता येते?

किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला खाते उघडता येणे शक्य आहे व विशेष म्हणजे यामध्ये तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकतात. एखाद्या मुलाचे वय जर दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर असा मुलगा देखील या योजनेत खाते उघडू शकतो.

 किसान विकास पत्र योजनेमध्ये खाते उघडताना ही कागदपत्रे सोबत ठेवा

तुम्हाला देखील किसान विकास पत्र योजनेमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट फोटो, किसान विकास पत्र एप्लीकेशन फॉर्म इत्यादी कागदपत्र आवश्यक असतात.

 योजना पूर्ण होण्याआधी देखील पैसे काढता येतात?

किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला योजना पूर्ण होण्याआधी म्हणजे वेळेच्या आधीच पैसे काढायचे असतील तर त्याकरता तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागते. जेव्हा तुम्ही गुंतवणूक सुरू करतात तेव्हा त्या सुरू केल्याच्या तारखेपासून दोन वर्षे सहा महिन्यानंतर तुम्ही ही योजना मॅच्युअर म्हणजेच परिपक्व होण्याच्या अगोदर काही रक्कम काढू शकतात.

Ajay Patil