आर्थिक

EPF Rule: तुम्हाला 15 हजार पगार असेल तरी देखील तुम्ही पीएफ खात्याच्या माध्यमातून बनू शकतात करोडपती! समजून घ्या कॅल्क्युलेशन

Published by
Ajay Patil

EPF Rule:- जेव्हा आपण सरकारी किंवा एखादा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करत असतो तेव्हा आपल्या पगाराचा काही भाग हा आपल्या ईपीएफ अर्थात पीएफ खात्यामध्ये जमा होत असतो व ही जमा झालेली रक्कम आपल्या निवृत्तीनंतर आपल्याला मिळते व त्यावेळी ती आर्थिक मजबुतीसाठी खूप महत्त्वाची असते.

आयुष्याच्या उतारवयाच्या कालावधीत आर्थिक दृष्टिकोनातून आपण कोणावर अवलंबून राहू नये या दृष्टिकोनातून पीएफ म्हणजेच ईपीएफ खात्यामधील जमा झालेली रक्कम ही फायद्याचे असते.आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण एखाद्या कंपनीत किंवा सरकारी क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा आपल्या पगारातून काही रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा होते व विशेष म्हणजे आपल्या पीएफ खात्यामध्ये आपण काम करत असलेल्या कंपनी म्हणजेच नियोक्ताच्या माध्यमातून देखील काही रकमेचे योगदान दिले जाते.

यामध्ये किती रक्कम पीएफ खात्यात जमा होईल हे तुम्हाला असलेल्या पगारानुसार ठरत असते म्हणजे या जमा झालेल्या रकमेवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून व्याज देखील दिले जाते व सध्या हा व्याजदर 8.25 टक्के इतका आहे. तसेच याबाबत जर आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे नियम पाहिले तर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून काही विशिष्ट गरज असेल तर तेव्हा पैसे काढता येऊ शकतात.

परंतु निवृत्तीपर्यंत जर तुम्ही पैसे काढले नाहीत तर या माध्यमातून तुम्ही या माध्यमातून तुम्ही मोठी रक्कम देखील जमा करू शकता. या पीएफ अकाउंटमध्ये जी रक्कम जमा होते ती संबंधित कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी  आणि त्यांना मिळणारा महागाई भत्ता यांच्या एकत्रित रकमेच्या 12 टक्के रक्कम पगारातून कापली जात असते. समजा तुम्हाला जर 15 हजार रुपये पगार असेल तर तुम्ही तुमच्या ईपीएफ अर्थात पीएफ खात्यात किती रक्कम जमा करू शकतात? त्याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 तुम्हाला जर पंधरा हजार रुपये पगार असेल तर ईपीएफमध्ये किती रक्कम जमा होईल?

समजा एखाद्या कर्मचाऱ्याला बेसिक सॅलरी अधिक महागाई भत्ता मिळून पंधरा हजार रुपये पगार आहे. तर संबंधित कर्मचाऱ्याचे त्याच्या ईपीएफ खात्यातील योगदान हे 15000 रुपयांच्या 12% म्हणजेच 1800 रुपये प्रति महिना इतकी असेल व यासोबतच कंपनीचे ईपीएफ मधील योगदान हे पंधरा हजार रुपयांच्या 3.67% म्हणजेच 550.5 रुपये इतके असेल.

तसेच कंपनीचे ईपीएसमधील योगदान पंधरा हजार रुपयांच्या 8.33% म्हणजेच 1249.5 रुपये इतके असणार. म्हणजेच एकूण प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांचे ईपीएफ खात्यामध्ये 1800+550.5=2350.5 रुपये जमा होतील. या एकूण जमा रकमेवर वार्षिक 8.25 टक्के दराने व्याज मिळते.

यामध्ये पाहिले तर पंधरा हजार रुपये पगार असल्यास वयाच्या 25 व्या वर्षापासून कर्मचाऱ्याने पैसे गुंतवणूक करायला सुरुवात केल्यास वयाच्या साठव्या वर्षापर्यंत 69 लाख 3 हजार 243 रुपये जमा होतील व विशेष म्हणजे यामध्ये कालांतराने झालेला पगार वाढीचा देखील फायदा मिळेल.

या एकूण जमा झालेल्या रकमेवर वार्षिक 8.25 टक्के व्याजदरानुसार 35 वर्षात कर्मचाऱ्यांच्या नावे निवृत्तीच्या वेळी एक कोटी नऊ लाख रुपये जमा होतील. याच पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर जास्त पगार असल्यावर जास्त पैसे जमा यामध्ये होतात.

Ajay Patil