Profitable Business Ideas:- कुठलाही व्यवसाय जर मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर साहजिकच त्याच्याकरिता भांडवल जास्त लागते. परंतु बऱ्याचदा जास्त प्रमाणात भांडवल टाकून एखादा व्यवसाय सुरू केला जातो व त्या माध्यमातून मात्र अपेक्षित असलेले आर्थिक उत्पन्न आपल्याला मिळत नाही व व्यवसाय बंद करण्याची वेळ आपल्यावर येते.
त्यामुळे तुमच्याकडे भांडवल जरी जास्त असले तरी देखील व्यवसायाची सुरुवात करताना मात्र त्या व्यवसायाला असलेली मागणी पूर्ण अभ्यास करून व्यवसाय सुरू करणे खूप गरजेचे असते.
या मुद्द्याला धरून जर आपण सध्या भारताचे स्थिती बघितली तर भारतामध्ये ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर विकास दिसून येत आहे शहरीकरण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत अनेक मोठमोठे व्यवसाय उभे करण्याला मोठा वाव आहे.
आपल्याला माहित आहे की शहरांमध्ये किराणा मालाच्या दृष्टिकोनातून बघितले तर मोठमोठे दुकाने आणि मोठमोठे मॉल आपल्याला दिसून येतात. परंतु या व्यतिरिक्त मिनी डिपार्टमेंटल स्टोअर्स हा एक महत्त्वाचा व्यवसाय असून ग्राहकांना आवश्यक असलेल्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळवून देणे हा या व्यवसायाचा प्रमुख उद्देश आहे.
आपल्याला माहित आहे की मिनी डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच दूध, कोल्ड्रिंक्स पासून तर किराणा माल इत्यादी सगळ्या प्रकारचे उत्पादने आपल्याला एकाच स्टोअरमध्ये मिळतात.
विशेष म्हणजे अशा प्रकारचे स्टोअर्स तीन ते चार किलोमीटरच्या एरियामध्ये दोन जरी असली तरी चांगली चालतात. त्यामुळे मिनी डिपार्टमेंटल स्टोअर्स व्यवसाय हा खूप फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो. फक्त या व्यवसायासाठी भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. परंतु त्याप्रमाणे नफा देखील जास्त मिळतो.
कसे सुरु करावे स्वतःचे मिनी डिपार्टमेंटल स्टोअर्स?
ज्या ठिकाणी चांगली कॉलनी किंवा चांगली वसाहत आहे अशा ठिकाणी 2000 वर्गफुटाची जागा असेल तर या ठिकाणी तुम्ही मिनी डिपार्टमेंटल स्टोअर सुरू करू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्हाला रॅक्स लागतात.
यामध्ये तुम्ही भाज्या तसेच स्टेशनरी, किराणामाल, बेकरी उत्पादने व चॉकलेट इत्यादी उत्पादने ठेवू शकतात व याकरिता तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे रॅक बनवावे लागतात. तीन ते चार कर्मचारी सोबत घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात.
मिनी डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये जर तुम्हाला अत्याधुनिक सोयी सुविधा उभे करायचे असेल तर पैसा जास्त प्रमाणात लागतो. हा व्यवसाय आता हायटेक पद्धतीचा झाला असून यातील सर्व विक्री बारकोडने देखील होते.
तसेच तुमच्या स्टोअर्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे व्यवस्थित देखरेख तुम्हाला ठेवता येते. अगदी तुम्ही दुकानात जरी नसला तरी हा उद्योग चांगल्या पद्धतीने चालवता येऊ शकतो व मोबाईलवरून देखील तुम्ही व्यवसायावर लक्ष ठेवू शकतात. अशा पद्धतीचा हायटेक डिपार्टमेंटल स्टोअर सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 20 ते 40 लाख खर्च येतो.
यामध्ये तीस हजार रुपये भाडे तसेच कामगारांचा चाळीस हजारापर्यंतचा पगार, पाच हजार रुपये लाईट बिल, फर्निचर दोन ते चार लाख, उत्पादनाचा स्टॉक इत्यादी करिता 15 ते 30 लाख अशाप्रकारे यामध्ये भांडवल लागू शकते. तुम्ही जर तुमच्या मिनी डिपार्टमेंटल स्टोअर्सची ई-कॉमर्स वेबसाईट व ॲप बनवले तर खूप मोठा फायदा होतो.
या माध्यमातून ग्राहक तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात. अगदी एक लिटर दुधापासून तर साखर तसेच ब्रेड, केक इत्यादी उत्पादनांची तुम्ही ऑर्डर घेऊ शकतात व या माध्यमातून या व्यवसायाची सरासरी विक्री 50 हजारापासून ते एक लाखापर्यंत होते.
या व्यवसायात किती कमाई करता येऊ शकते?
या व्यवसायामध्ये साधारणपणे सात टक्के प्रॉफिट मार्जिन मिळू शकते व याप्रमाणे दररोज सात ते 14 हजार रुपये पर्यंतचा नफा तुम्हाला मिळू शकतो व याप्रमाणे महिन्याला दोन ते चार लाखांचा नफा आरामात मिळतो. खर्च एक ते दोन लाख रुपये वजा केले तर निम्मे पैसे निव्वळ नफा म्हणून तुम्हाला राहतात.