भविष्यामध्ये व्यक्तीला अनेक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. प्रामुख्याने मुलांचे उच्च शिक्षण तसेच लग्न कार्य इत्यादीवर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. त्या व्यतिरिक्त कोणाला सांगून न येणार दवाखान्याचा खर्च देखील कोणाच्या आयुष्यात कधी येईल याचा काही भरवसा नसतो.
त्यामुळे तुम्ही जे काही पैसे कमवत आहात त्यांची बचत करून आतापासून चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करणे खूप गरजेचे असते. परंतु गुंतवणूक करताना देखील गुंतवणूकितून परतावा चांगला मिळेल व गुंतवणूक सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून गुंतवणुकीचा पर्याय निवडणे खूप गरजेचे असते.
सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये जर तुम्हाला तुमच्या मुलांचे शिक्षण व लग्न इत्यादीवर होणाऱ्या खर्चाच्या टेन्शन पासून मुक्तता मिळवायचे असेल तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
समजा तुम्हाला जर तुमच्या मुलांचे शिक्षण व लग्नकार्य इत्यादी करिता पैसा जमा करायचा असेल तर तुम्ही मुलांचा किंवा मुलीचा जन्म होताच एसआयपी सुरू करणे गरजेचे आहे. या माध्यमातून तुम्ही 21 वर्षात मुलांच्या लग्न व शिक्षणाकरिता लाखो रुपयांचा निधी जमा करू शकतात.
प्रतिमहिना किमान 5 हजार रुपयांची एसआयपी 21 वर्षात देईल लाखो रुपये
तुम्हाला जर तुमचा मुलगा किंवा मुलीच्या लग्नासाठी व शिक्षणाकरिता पैसा जमा करायचा असेल तर तुम्ही मुलाचा जन्म होताच एसआयपी सुरू करणे गरजेचे आहे व याकरिता कमीत कमी पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू करावी. महिन्याला पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली तर कमीत कमी 21 वर्षे ती सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे.
एसआयपी मध्ये सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो व कधीकधी यापेक्षा देखील जास्त परतावा मिळू शकतो. जर तुम्ही दीर्घ कालावधी करिता एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर वेगाने संपत्ती वाढते. समजा तुम्ही 21 वर्षापर्यंत जर मुलाच्या नावाने पाच हजार रुपयांची एसआयपी केली व ती 21 वर्षे सातत्याने सुरू ठेवली
तर तुमचे एकूण एसआयपीमध्ये बारा लाख 60 हजार रुपये जमा होतात. पण त्या 21 वर्षात 12 टक्के दराने तुम्हाला 44 लाख 33 हजार 371 रुपये व्याज म्हणून मिळतात. म्हणजेच 21 वर्षानंतर तुम्हाला व्याज व मुद्दल असे मिळून 56 लाख 93 हजार 371 रुपये मिळतात.
समजा या 21 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 12 टक्क्यांऐवजी 15 टक्क्यांचा परतावा मिळाला तर 21 वर्षांमध्ये तुम्ही जमा केलेल्या प्रत्येक महिन्याला 5000 प्रमाणे बारा लाख 60 हजार रुपये गुंतवणुकीवर 15 टक्के दराने 76 लाख 3 हजार 364 रुपये व्याज मिळते. अशाप्रकारे तुमचे 21 वर्षानंतर व्याज व मुद्दल मिळून 88 लाख रुपये जमा होतात.
जमा होणाऱ्या या रकमेत तुम्ही मुलांचे लग्न तसेच उच्च शिक्षणाचा पूर्ण खर्च भागवून पैसा वाचवू शकता.