Post Office आरडी स्कीम मध्ये दर महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी किती रिटर्न मिळणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office RD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या रिस्की ठिकाणाला विशेष पसंती मिळू लागली आहे. याचे कारण म्हणजे येथून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.

शेअर मार्केटशी तुलना केली असता म्युच्युअल फंड थोडेसे सुरक्षित आहे. मात्र तरीही शेअर बाजारावर आधारित असल्याने या ठिकाणीही मोठी जोखीम असते यात शंकाच नाही. परंतु अनेकांना गुंतवणुकीत जोखीम नको असते. यामुळे सुरक्षित गुंतवणूक करण्याला आजही आपल्या देशात विशेष महत्त्व आहे.

परिणामी अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसची आरडी योजना, बँकेची एफडी योजना तसेच एलआयसी आणि पोस्टाच्या इतर बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आजची ही बातमी पोस्ट ऑफिस मध्ये आरडी करू इच्छिणाऱ्यांसाठी खूपच खास राहणार आहे.

कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दर महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी गुंतवणूकदाराला किती रिटर्न मिळू शकतात याविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेवर किती मिळते व्याज

पोस्ट ऑफिसची Recurring Deposit ही योजना एफडी योजनेप्रमाणेच आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्याला एक निश्चित रिटर्न दिला जातो. ही देशातील एक लोकप्रिय गुंतवणुकीची योजना आहे. ज्या लोकांना सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असते असे लोक या ठिकाणी गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवतात.

यातून मिळणाऱ्या रिटर्नबाबत बोलायचं झालं तर या योजनेतून गुंतवणूकदारांना 6.7% व्याजदराने रिटर्न मिळत आहेत. ही योजना एक सुरक्षित योजना आहे यामध्ये गुंतवलेले पैसे कधीच बुडू शकत नाहीत. हीच सुरक्षितता या योजनेत गुंतवणूक करण्याला भाग पाडते.

मात्र येथून मिळणारा परतावा हा काही एफडी योजनांपेक्षा आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणांपेक्षा खूपच कमी असल्याची तक्रार गुंतवणूकदारांकडून नेहमीच केली जाते. पण तरीही येथे गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दिले जात आहे यात शंकाच नाही.

5 वर्षांसाठी 5 हजार गुंतवले तर

या योजनेत जर गुंतवणूकदारांनी दरमहा पाच हजार रुपयाची गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक सलग पाच वर्षांसाठी कायम ठेवली तर 6.7% व्याजदराने मॅच्युरिटी वर 3.56 लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये तीन लाख रुपये ही गुंतवणूकदाराची गुंतवणूक राहणार आहे आणि वरील 56 हजार रुपये हे या योजनेतून मिळालेले व्याज राहणार आहे. परंतु व्याजदरात बदल झाला तर या रकमेतही बदल होईल याची नोंद गुंतवणूकदारांनी घेणे अपेक्षित आहे.