गुंतवणूक करणे म्हणजे लाखो रुपये एखाद्या चांगल्या योजनेमध्ये गुंतवणे असे नव्हे. गुंतवणूक ही तुम्ही अगदी छोट्या रकमेपासून देखील सुरू करू शकतात व सातत्याने अशी छोटी रक्कम गुंतवत गेल्यानंतर काही वर्षांनी मात्र लाखो रुपये तुम्ही जमा करू शकता. फक्त या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला खंड न पडू देता सातत्य ठेवणे गरजेचे असते.
आपल्याला माहित आहे की गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय म्हणजेच अनेक योजना उपलब्ध आहेत व यामध्ये बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजना या खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण या योजनांमध्ये जर पैसे गुंतवले तर गुंतवलेले पैसे सुरक्षित देखील राहतात व परतावा देखील चांगला मिळतो.
त्यामुळे या अनुषंगाने या लेखात आपण पोस्ट ऑफिसची एक महत्त्वाची योजना बघणार आहोत. या योजनेतून तुम्ही फक्त शंभर रुपये जरी गुंतवले तरी काही वर्षांनी तुम्ही लाखो रुपयांचा फंड गोळा करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या महत्त्वपूर्ण योजनेचे नाव आहे आरडी म्हणजेच पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम होय.
पोस्टाच्या या योजनेच्या शंभर रुपये गुंतवाल तर मिळतील लाखो रुपये
जर आपण गुंतवणूक योजनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत व या योजनांमध्ये पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजेच पोस्ट ऑफिस आरडी एक महत्त्वाची योजना आहे व या योजनेत तुम्ही शंभर रुपयांमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी 2024 पासून या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 6.7 टक्के वार्षिक व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे व यामध्ये चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा मिळतो.
शंभर रुपयाची गुंतवणूक कशी ठरेल फायद्याची?
समजा तुम्ही दररोज पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मध्ये शंभर रुपयांची बचत केली तर तुमची महिन्याला तीन हजार रुपयांची बचत होते व या तीन हजार रुपयांची गुंतवणूक म्हणजेच दिवसाला शंभर रुपयांची गुंतवणूक केली तर लाखो रुपयांची तुमची गुंतवणूक या योजनेत जमा होते.
आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजनेचे कॅल्क्युलेटर बघितले तर त्यानुसार तुम्ही जर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची आरडी केली तर पाच वर्षात परिपक्वतेवर म्हणजेच या योजनेच्या समाप्तीवर तुम्हाला दोन लाख 14 हजार रुपयांचा फायदा मिळतो. दररोज शंभर रुपये गुंतवल्यावर तुमचे या योजनेत पाच वर्षात एक लाख 80 हजार रुपये जमा होतात व या एक लाख 80 हजार वर तुम्हाला 34 हजार 97 रुपये व्याज मिळते.
विशेष म्हणजे ही योजना परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला जर आरडी खातं परत सुरू ठेवायचा असेल तर तुम्ही यात आणखी पाच अशा पर्यंत ते सुरू ठेवू शकतात. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता व कमीत कमी शंभर रुपयांमध्ये जर तुम्ही या योजनेत खाते उघडले तर तुम्ही दहा- दहा रुपयांच्या पटीमध्ये पैसा जमा करू शकतात. तसेच या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कमाल गुंतवणुकीची कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.
एकच व्यक्ती अनेक खाते देखील या योजनेमध्ये उघडू शकते. तीन व्यक्ती मिळून एक संयुक्त खाते देखील या योजनेत उघडता येते. तर तुम्हाला अल्पवयीन मुला-मुलींकरिता या योजनेत खाते उघडायचे असेल तर अशांकरिता त्यांचे पालक या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्षाचा असून त्या अगोदर जर तुम्हाला प्री मॅच्युअर क्लोजर करायचा असेल तर तीन वर्षानंतर देखील तुम्ही योजना बंद करू शकतात.
महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या आरडी खात्यावर 12 हप्ते जमा केले असतील तर तुम्हाला जमा झालेल्या रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज देखील मिळते.
अशाप्रकारे शंभर रुपये गोळा करून तुम्ही पाच वर्षात दोन लाख रुपये पेक्षा जास्त पैसा या योजनेच्या माध्यमातून मिळवू शकतात.