Post Office MIS Scheme : भारतात एलआयसी, पोस्ट ऑफिस, बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. खरंतर, अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.
मात्र शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण असते. येथे अनेकदा चांगला परतावा मिळतो तर काही वेळा नुकसान होण्याची शक्यता देखील अधिक असते. यामुळे, अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काहीजण बँकेत एफडी करण्याला देखील प्राधान्य देतात.
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम ही देखील अशीच एक योजना आहे. ही एक डिपॉझिट स्कीम आहे. म्हणजेच यामध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते आणि नंतर दरमहिना एक फिक्स अमाऊंट गुंतवणूकदारांना मिळत असते.
योजनेत सिंगल अकाउंट मध्ये नऊ लाख रुपये आणि जॉइंट अकाउंट मध्ये कमाल 15 लाख रुपये एवढी गुंतवणूक करता येते. योजनेमध्ये गुंतवणूकदार जेवढे रक्कम जमा करतात त्यानुसार गुंतवणूकदाराला व्याज दिले जाते. हे व्याज दर महिन्याला मिळते. सध्या या योजनेअंतर्गत 7.4% एवढे व्याज दिले जात आहे.
या योजनेत 5 वर्षांसाठी रक्कम गुंतवावी लागते. पाच वर्षानंतर म्हणजेच मॅच्युरिटी नंतर हा पैसा पुन्हा गुंतवणूकदाराला परत केला जातो. जर गुंतवणूकदाराला 5 वर्षानंतरही या योजनेत गुंतवणूक तशीच राहू द्यायची असेल तर पाच वर्षानंतर पुन्हा एकदा नवीन अकाउंट ओपन करावे लागते. म्हणजेच तेच अकाउंट कंटिन्यू ठेवता येत नाही.
पण या योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या आधीच जर गुंतवणूकदाराला पैसे काढायचे असतील तर पेनल्टी द्यावी लागते. जर तुम्ही एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ठेव रकमेतील 2% कपात केली जाते आणि उर्वरित रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाते.
जर तुम्हाला खाते उघडल्यानंतर 3 वर्षांनी आणि 5 वर्षापूर्वी पैसे काढायचे असतील, तर जमा केलेल्या रकमेतून 1% वजा केल्यावर ठेव रक्कम तुम्हाला परत केली जाते.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळणार 9,250 रुपये
पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये सिंगल अकाउंटमध्ये 9 लाख रुपये जमा केले तर 7.4 टक्के व्याजदराने गुंतवणूकदाराला दरमहा 5,500 रुपये मिळू शकतात. तसेच जर तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा केले तर गुंतवणूकदाराला दरमहा 9,250 रुपये कमवू शकता.