आर्थिक

NPS योजनेत दरमहा ‘इतकी’ गुंतवणूक केली तर रिटायरमेंटनंतर तुम्हाला मिळणार एक लाख रुपये पेन्शन, वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Published by
Ahmednagarlive24 Office

NPS Calculation : जे लोक शासकीय सेवेत कार्यरत आहेत म्हणजेच सरकारी कर्मचारी आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून रिटायरमेंटनंतर पेन्शन पुरवली जाते. मात्र खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळत नाही. परंतु रिटायरमेंटनंतर जास्त पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीत उतार-वयात जास्तीचे पैसे जवळ असणे आवश्यक आहे.

कुटुंबातील इतर सदस्यावर अवलंबून राहण्यापेक्षा जर स्वतःकडे पैसे असतील तर निश्चितच म्हातारपणात देखील स्वाभिमानाने जगता येते. अशा परिस्थितीत अनेक लोक वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करतात. काही लोक म्युच्युअल फंड सारख्या थोड्याशा जोखीम पूर्ण योजनेमध्ये गुंतवणूक करतात.

तर काही लोक एलआयसी, पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला पसंती दाखवतात. पण अनेक लोक एनपीएसस योजनेत देखील गुंतवणूक करण्याला विशेष पसंती दाखवत आहेत. जर तुम्हीही एनपीएस योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.

एनपीएस अर्थातच नॅशनल पेन्शन स्कीम ही केंद्र सरकारची योजना आहे. यामुळे या योजनेत गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते. दरम्यान आज आपण एनपीएस योजनेतून रिटायरमेंटनंतर दरमहा एक लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि किती कालावधीसाठी ही गुंतवणूक करावी लागेल याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

एक लाख रुपये पेन्शनसाठी किती रक्कम गुंतवावी लागणार

जर तुमचे वय 25 वर्षे असेल तर तुम्हाला येथून पुढे 35 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. म्हणजेच वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. आता या योजनेतून एक लाख रुपये पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला दर महिन्याला 12,000 रुपये 35 वर्षांसाठी गुंतवावे लागणार आहेत.

दर महिन्याला बारा हजार रुपये गुंतवले तर 35 वर्षात जवळपास 45 लाख रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट तयार आहे. जर समजा तुम्हाला या गुंतवणुकीवर दहा टक्के रिटर्न मिळालेत तर मॅच्युरिटीवर तुमची एकूण रक्कम साडेचार कोटी रुपये एवढी होईल. पण या योजनेअंतर्गत तुम्हाला ऍनुटीमध्ये मॅच्युरिटी वर मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी किमान 40% रक्कम गुंतवावी लागते.

पण जर तुम्हाला एक लाख रुपये मासिक पेन्शन हवे असेल तर तुमच्या गुंतवणुकीची ४५% म्हणजे २.० कोटी रुपये तुम्हाला ऍनुटीमध्ये गुंतवावे लागणार आहेत. या गुंतवलेल्या रकमेवर जर अंदाजे 6 टक्के दराने रिटर्न मिळाले तर तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी पेन्शन १.०७ लाख प्रति महिना एवढे पेन्शन मिळू शकणार आहे.

Ahmednagarlive24 Office