Investment In SIP:- उज्वल आणि समृद्ध आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक फार महत्त्वाची असते व त्यामुळे गुंतवणुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. तुम्ही जो काही पैसा कमावता आणि पैशांची बचत करता तो पैसा चांगल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवून तुम्ही काही कालावधीने चांगला असा निधी या माध्यमातून जमा करू शकतात
व तुमच्या भविष्यासाठी तो फायद्याचा ठरतो. गुंतवणुकीचे अनेक असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत व गुंतवणूकदार त्यांच्या पद्धतीनुसार आणि बजेटनुसार गुंतवणूक पर्यायांची निवड करतात व तिथे गुंतवणूक करतात.
सध्या जर बघितले तर म्युच्युअल फंड एसआयपी एक सगळ्यात लोकप्रिय होत असलेल्या गुंतवणुकीचा पर्याय असून दीर्घ मुदतीसाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एसआयपी हा एक उत्तम असा पर्याय असून यामध्ये तुम्ही जितकी जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करतात तितका पैसा तुम्हाला जास्त मिळतो.
एसआयपीमध्ये तुम्हाला लाखो रुपये गुंतवण्याची गरज भासत नाही. तुम्ही अगदी 500, एक हजार रुपये तसेच एक हजार पाचशे आणि दोन हजार रुपयांची एसआयपी देखील करू शकतात. या प्रकारची एसआयपी जर तुम्ही पाच वर्षे चालवली तरी देखील तुम्ही चांगला पैसा या माध्यमातून मिळवू शकतात.
एसआयपीची वेगवेगळी रक्कम आणि मिळणारा परतावा
2- पाचशे रुपयांची एसआयपी केली तर- समजा तुम्ही पाच वर्षाकरिता पाचशे रुपयांची प्रति महिना गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक 30000 रुपयांची होते.
यामध्ये तुम्हाला जर 12 टक्के दराने परतावा मिळाला तर त्यावर 11,243
रुपयांचा परतावा तुम्हाला मिळतो व पाच वर्षानंतर मुद्दल आणि व्याज मिळून तुम्हाला 41 हजार 243 रुपये मिळतात.
2- एक हजार रुपयांची एसआयपी केली तर- समजा तुम्ही पाच वर्षांकरिता एक हजार रुपयांची एसआयपी सुरू केली तर तुमचे एकूण 60 हजार रुपये यामध्ये जमा होतात व त्यावर 12 टक्क्यांचा परतावा मिळाल्यानंतर तुम्हाला 22,486 रुपये व्याज मिळते. अशाप्रकारे तुम्ही पाच वर्षानंतर 82 हजार 486 रुपये मिळवू शकतात.
3- 1500 रुपयांची एसआयपी केली तर- समजा तुम्ही महिन्याला 1500 रुपयांची एसआयपी करत आहात आणि पाच वर्षे कालावधीसाठी तुम्ही सातत्यपूर्ण रीतीने ती सुरू ठेवली तर तुमचे पाच वर्षात 90 हजार रुपयांची गुंतवणूक होते.
या गुंतवणुकीवर तुम्हाला 12% दराने 33 हजार 730 रुपये व्याज मिळते व पाच वर्षानंतर व्याज आणि मुद्दल मिळून एक लाख 23 हजार 730 रुपये तुम्हाला मिळतात.
4- दोन हजार रुपयांची एसआयपी केली तर- तुम्ही जर दर महिन्याला दोन हजार रुपयांची एसआयपी पाच वर्षासाठी केली तर तुमचे पाच वर्षात एक लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक होते व त्यावर 12% दराने 44 हजार 973 रुपये व्याज मिळेल व पाच वर्षात व्याज आणि मुद्दल मिळून एक लाख 64 हजार 973 रुपये तुम्हाला मिळतात.