Mahindra Tractor Dealership:- महिंद्रा हा गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून भारतातील नंबर एकचा ट्रॅक्टर ब्रँड आहे. एवढेच नाही तर जागतिक स्तरावर देखील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी ओळखली जाते.
महिंद्रा अँड महिंद्रा च्या माध्यमातून वीस, 30, 40, 50 आणि 60 प्लस एचपीचे पावर रेंजमध्ये ट्रॅक्टर मिळतात. सध्या जर आपण भारताचा विचार केला तर महिंद्रा ट्रॅक्टरची भारतामध्ये 1000 पेक्षा अधिक डीलरशिप आणि 300 पेक्षा जास्त सेवा केंद्र आहेत
व त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पद्धतीने तुम्हाला देखील महिंद्रा ट्रॅक्टर फ्रेंचाईसी म्हणजे डीलरशिप घ्यायची असेल तर तुम्ही देखील या माध्यमातून खूप चांगला पैसा मिळवू शकतात. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशिप कशी घेतली जाऊ शकते याबद्दल माहिती बघणार आहोत.
महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घेण्यासाठी किती गुंतवणूक गरजेची आहे?
भारतात महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशिप मिळवण्यासाठी तुम्हाला 50 ते 60 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच तुम्हाला कंपनीला सिक्युरिटी म्हणून आठ ते दहा लाख रुपये द्यावे लागतील. एवढेच नाही तर तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टर एजन्सी घेण्यासोबतच शेती उपकरणे विक्री आणि सेवा प्रदान करण्याच्या सुविधेचा लाभ देखील घेता येऊ शकतो.
महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशिपसाठी आवश्यक जमीन
महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशिप मिळवण्यासाठी तुम्हाला किती जागा लागेल हे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. साधारणपणे एका ट्रॅक्टरच्या डीलरशिपसाठी तुमच्याकडे शोरूम, स्टोअर रूम आणि विक्री क्षेत्र इत्यादीसाठी जागेची आवश्यकता असणे गरजेचे आहे.
साधारणपणे ट्रॅक्टर शोरूम साठी पंधराशे ते 2000 चौरस फूट क्षेत्रफळाची जागा आवश्यक आहे तर स्टोर रूम करिता पाचशे ते सातशे चौरस फूट क्षेत्र आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त इतर कामांकरिता तुम्हाला दोनशे ते तीनशे चौरस फुट क्षेत्र आवश्यक आहे. एकंदरीतपणे तुम्हाला महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशिपकरिता तीन ते चार हजार चौरस फूट क्षेत्र इतकी जमीन असावी.
महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशिप साठी आवश्यक कागदपत्रे
यामध्ये तुम्हाला काही वैयक्तिक कागदपत्रे आणि मालमत्तेचे कागदपत्र देणे गरजेचे असते.
वैयक्तिक कागदपत्रांमध्ये
आधार कार्ड, मतदार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, रेशन कार्ड, बँक खाते पासबुक, ईमेल आयडी तसेच फोन नंबर व फोटो, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे
मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये
पत्यासह संपत्तीचे कागदपत्र पूर्ण करणे गरजेचे आहे व यामध्ये भाडेपट्टी करार आणि इतर एनओसीच आवश्यक असतात.
महिंद्रा ट्रॅक्टर डीलरशिपसाठी अर्ज कसा करावा?
महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर महिंद्रा ट्रॅक्टर च्या अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे व त्या ठिकाणी तुम्हाला मेक अँन इन्क्वायरी या पर्यायावर क्लिक करावे
लागेल. त्या ठिकाणी नवीन पेज उघडेल व एक फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या फॉर्ममध्ये तुमचे सगळे वैयक्तिक माहिती व्यवस्थित तुम्हाला देणे गरजेचे राहील व त्यानंतर महिंद्रा ट्रॅक्टरची टीम स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल.
संपर्कासाठी ई–मेल
tractorcare@mahindra.com या ईमेल आयडी वर तुम्ही मेल करून माहिती घेऊ शकतात
किंवा
1800-2100-700 या नंबर वर संपर्क साधू शकता.