आर्थिक

Business Idea: पोल्ट्री व्यवसायात लाखो रुपये मिळवायचे असतील तर ‘या’ कोंबडीचे पालन ठरेल फायद्याचे; 5 महिन्यात बनवेल लखपती

Published by
Ajay Patil

Business Idea:- सध्या शेतीसोबत जे काही जोडधंदे केले जातात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यामुळे आता अनेक सुशिक्षित तरुण देखील अशा जोडधंद्यांकडे वळले असून तंत्रज्ञानाच्या वापराने मोठ्या प्रमाणावर पैसा देखील कमवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर उभारण्याकडे आपल्याला सध्या तरुणाईचा कल दिसून येत आहे.

यात कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग हा व्यवसाय शेतीशी निगडित असून चांगले नियोजन केले तर कमी पैशात तुम्हाला चांगला नफा मिळवून देण्याची क्षमता या व्यवसायात आहे.

याकरिता तुम्हाला देखील पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल तर  तुम्ही कडकनाथ या जातीच्या कोंबडीचे पालन करून अगदी कमी कालावधीमध्ये लाखो रुपये मिळवू शकतात. तसे पाहायला गेले तर कडकनाथ ही कोंबडीची जात आता प्रत्येकाला माहिती आहे. या कोंबडीचे मांस ते अंडी हे इतर कोंबड्यांच्या तुलनेमध्ये जास्त किमतीला विकले जाते व हाच मुद्दा या कोंबडीच्या पालनामध्ये फायद्याचा ठरतो.

 कडकनाथ कोंबडीचे पालन फायद्याचे का ठरते?

कडकनाथ कोंबडी पालन करण्यामागील जर आपण फायदे पाहिले तर ते खूप आहेत. कडकनाथ कोंबडीची अंडी हे साधारणपणे 40 ते 50 रुपयांना एक अंडी या दराने विकले जातात. जर आपण या अंड्यांचा दर पाहिला तर तो इतर कोंबड्यांच्या अंड्यापेक्षा साधारणपणे तीन ते चार पट जास्त आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ही कडकनाथ कोंबडीची जात इतर कोंबड्यांच्या तुलनेमध्ये रोगांना अधिक प्रतिकारक्षम आहे.

तसेच या कडकनाथ कोंबडीचे मांस खायला अतिशय चवदार आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्यामुळे त्याचे दर किलोला तब्बल 1000 रुपयांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे भारतातील दिल्ली तसेच मुंबई आणि कोलकत्ता यासारख्या मोठ्या शहरांमध्ये या चिकनची मागणी खूप जास्त आहे. तुम्हाला माहिती असेलच की क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी देखील कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतो व रांची या ठिकाणी त्याचा मोठा पोल्ट्री फार्म देखील आहे.

 कसा करू शकता तुम्ही कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय?

तुम्हाला देखील कडकनाथ कोंबडी पाळायची असेल तर तुम्हाला पोल्ट्री फार्म सुरू करावा लागतो व असा विचार तुमच्या मनामध्ये असेल तर त्याकरिता तुम्हाला कमीत कमी दीडशे चौरस फूट जागेची गरज भासते. या जागेवर तुम्ही छोटेसे शेड उभारून शंभर कडकनाथ पिल्ले आरामात पाळू शकतात. साधारणपणे पाच महिन्यात ही पिल्ले विक्रीसाठी पूर्णपणे तयार होतात व त्याची विक्री तुम्ही करू शकतात व पाच महिन्यानंतर लाखो रुपये मिळवू शकतात.

शंभर ऐवजी तुम्ही 50 कडकनाथ कोंबड्यांचे संगोपन जरी केले तरी तुम्ही पन्नास हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळवू शकतात. हा पैसा तुम्हाला कोंबड्यांपासून मिळणारी अंडी आणि मांस विकून मिळवता येतो. त्यामुळे जर तुमचा पोल्ट्री फार्म सुरू करायचा विचार असेल तर अगदी 50 ते 100 पिल्ले विकत घेऊन तुम्ही कडकनाथ कोंबडी पालन सुरू केले तर कमी वेळेमध्ये चांगला पैसा मिळवू शकतात.

Ajay Patil