स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 15 लाखाचे होम लोन घेतलं तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Home Loan : अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. वाढती महागाई, बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, इंधन दरवाढ यामुळे घरांच्या किमती सातत्याने वाढू लागल्या आहेत. हेच कारण आहे की आता सर्वसामान्यांना घर घेणे खूपच अवघड वाटू लागले आहे. एक रकमी आणि रोखीने घर घेणे तर आता मध्यमवर्गीयांसाठी जवळपास अशक्यचं झाले आहे.

वाढत्या महागाईमुळे महिन्याकाठी हाती येणारा पगार हा संसाराच्या गरजा पुरवण्यातच निघून जातो. अशा परिस्थितीत घरासाठी एवढी मोठी अमाऊंट सेव करणे म्हणजे खूपच अवघड काम बनले आहे. यामुळेच आता अनेकजण होम लोन घेऊन स्वप्नातील घर तयार करण्याचा निर्णय घेत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेक जाणकार लोकांनी देखील होम लोन घेऊन घर बांधणे कोणत्याही परिस्थितीत वावगे नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान जर तुम्हीही होम लोन घेण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही खूपच महत्वाची आणि कामाची बातमी राहणार आहे. विशेषतः ज्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होम लोन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. आज आपण जर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 15 लाख रुपये होम लोन घेतले तर किती रुपयाचा मासिक हप्ता कर्जदाराला भरावा लागेल याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

SBI Home Loan चे व्याजदर काय आहेत?

एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे करोडो कस्टमर आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय होमलोनचे अर्थातच गृह कर्जासाठीचे व्याजदर 8.60 टक्क्यांपासून सुरू होतात.

जर समजा तुम्हाला याच व्याजदरात एसबीआयकडून 15 लाखाचे होम लोन मिळाले आणि तुम्ही या होम लोनची परतफेड 20 वर्षाची केली तर तुम्हाला 13 हजार 113 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. तुम्हाला या कालावधीत 16 लाख 46 हजार 986 रुपये एवढे व्याज द्यावे लागणार आहे.

म्हणजेच व्याज आणि होम लोन ची रक्कम असे एकूण 31 लाख 46,986 रुपये तुम्हाला फेडावे लागणार आहेत. तथापि एसबीआयकडून स्वस्तात कर्ज मिळवण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असायला हवा. सिबिल स्कोर चांगला असेल तर स्वस्तात कर्ज उपलब्ध होतं शिवाय कर्जाची रक्कम देखील वाढू शकते.