आर्थिक

SBI मधून 3 लाखाचे वैयक्तिक कर्ज घेतले तर किती रुपयाचा EMI भरावा लागणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Published by
Ahmednagarlive24 Office

SBI Personal Loan Interest Rate : अलीकडे महागाईमुळे अनेकांना संसाराच्या गरजा भागवणे कठीण झाले आहे. महागाईमुळे महिन्याकाठी येणारा पगार देखील आता पुरतं नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांना अनेकदा पर्सनल लोन अर्थातच वैयक्तिक कर्ज घ्यावे लागते. देशातील सर्व बँकां पर्सनल लोन देत आहेत. खरंतर, जाणकार लोकांनी खूपच आवश्यकता असली तेव्हाच पर्सनल लोन काढण्याचा सल्ला दिला आहे.

कारण की, पर्सनल लोन साठी ग्राहकांना अधिकचे व्याजदर द्यावे लागते. यामुळे जेव्हा दुसरीकडून पैशांचे ऍडजेस्टमेंट होत नसेल अशाच परिस्थितीमध्ये पर्सनल लोन काढले गेले पाहिजे असे मत व्यक्त होत आहे. दरम्यान आज आपण एसबीआयकडून अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जर 3 लाख रुपयांचे वयक्तिक कर्ज काढले तर किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरतर, स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच SBI आपल्या बँक ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. नुकतेच बँकेने एफडी करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन दर जाहीर केले आहेत. FD साठीचे व्याज वाढवण्याचा मोठा निर्णय एसबीआयने घेतला आहे. याव्यतिरिक्त एसबीआयकडून महिलांना कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

शिवाय वैयक्तिक कर्ज देखील इतर बँकेच्या तुलनेत स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न एसबीआय करत आहे. आता आपण एसबीआय मधून जर तीन लाख रुपये पर्सनल लोन घेतले तर एसबीआयला किती व्याज द्यावे लागेल आणि मासिक हप्ता किती रुपयांचा राहणार याबाबत जाणून घेणार आहोत.

मीडिया रिपोर्टनुसार एसबीआय च्या माध्यमातून पर्सनल लोन साठी 11.05 एवढे व्याजदर आकारले जात आहे. जर या व्याजदरावर एसबीआय कडून तीन लाख रुपये घेतलेत आणि पर्सनल लोनची परतफेड 5 वर्षे एवढी ठेवली तर सदर कर्जदार व्यक्तीला 6530 रुपये एवढा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच या कर्जासाठी 91815 रुपये एवढे व्याज भरावे लागणार आहे.

अर्थातच पाच वर्षात तीन लाख रुपये मुद्दल आणि 91 हजार 815 रुपये एवढे व्याज असे एकूण 3,91,813 रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहेत. मात्र व्याजदरात काही बदल झाल्यास ईएमआय मध्ये देखील बदल होणार आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे.

Ahmednagarlive24 Office