FD Interest Rates : जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका एफडीबद्दल माहिती देणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमवू शकाल.
मुदत ठेवी हे गुंतावनमधील सर्वात सुरक्षित माध्यम मानले जाते. अशातच जर तुम्हाला येथे सुरक्षितेसह उत्तम परतावा मिळत असेल तर का नको. सध्या अनेक बँका त्यांच्या मुदतपूर्तीच्या ठेवींवर व्याजदर वाढवत आहेत. सध्या बँका मुदत ठेवींवर ९.५० टक्के पर्यंत व्याज देत आहे. यामध्ये स्मॉल फायनान्स बँका आघाडीवर आहेत.
या बँक आपल्या 1001 दिवसांच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्के पर्यंत व्याज देत आहे. तसेच 6 महिने ते 201 दिवसांपर्यंतच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के व्याज देत आहेत. त्याच वेळी, बँक 501 दिवसांच्या एफडीवर 9.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 701 दिवसांच्या मुदत ठेवीवर 9.45 टक्के व्याज देत आहेत. दरम्यान आज आपण अशा दोन बँका जाणून घेणार आहोत, ज्या मुदत ठेवींवर सर्वाधिक परतावा ऑफर करत आहेत.
ॲक्सिस बँक
ॲक्सिस बँकेने 5 फेब्रुवारी 2024 पासून मुदत ठेवींच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. सुधारित दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू आहेत. सामान्य लोकांना मुदत ठेवींवर 7.20 टक्के पर्यंत जास्तीत जास्त व्याज मिळू शकते आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के पर्यंत व्याज मिळू शकते. ॲक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 4.8 टक्के ते 7.85 टक्के पर्यंत व्याज देत आहेत.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेने घरगुती, एनआरओ, एनआरई ग्राहकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 3 फेब्रुवारी 2024 पासून लागू आहेत. बँक सामान्य लोकांना 4.75 टक्के ते 7.40 टक्के पर्यंत व्याज देत आहे. त्याच वेळी, HDFC बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 5.25 टक्के ते 7.90 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवरील मानक दरांपेक्षा ५० बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळते.