आर्थिक

LIC Policy : दरमहा नियमित पेन्शन हवी असेल तर LIC च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

Published by
Ahmednagarlive24 Office

LIC Policy : सध्या एलआयसी लोकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे, LIC कडून अशा अनेक योजना ऑफर केल्या जात आहेत ज्या लोकांच्या भाल्यासाठी काम करत आहेत. LIC कडे आपल्या प्रतयेक ग्राहकांसाठी एका पेक्षा एक योजना आहेत, ज्यामध्ये देशातील कोणताही नागरिक गुंतवणूक करून नफा मिळवू शकतो.

जर तुम्ही देखील LIC मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि अशी पॉलिसी शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर दरमहा पेन्शनचा लाभ मिळेल, तर ही योजना तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. चला या खास पॉलिसीबद्दल जाणून घेऊया…

LIC द्वारे एक उत्कृष्ट पॉलिसी चालवली जात आहे ज्यामध्ये तुम्हाला ठराविक रक्कम गुंतवून दरमहा पेन्शनचा लाभ मिळतो. एलआयसी जीवन अक्षय पॉलिसी असे या पॉलिसीचे नाव असून या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून देशातील कोणताही नागरिक लाभ घेऊ शकतो.

एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दरमहा प्रीमियम भरावा लागत नाही आणि एकवेळच्या गुंतवणुकीवर तुम्हाला आयुष्यभर दर महिन्याला पेन्शनचा लाभ दिला जातो. या कारणास्तव लोकांना एलआयसीची ही पॉलिसी खूप आवडत आहे आणि देशातील लाखो लोक यामध्ये गुंतवणूक करत आहेत.

एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये, तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ दिला जाईल. या योजनेत, पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला लाभ दिला जातो जेणेकरुन कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना सहज करता येईल.

LIC च्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये तुम्हाला एकावेळी 40 लाख 72 हजार रुपये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला LIC कडून जीवन अक्षय पॉलिसी अंतर्गत दरमहा 20 हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळू लागतो. LIC मध्ये इतर अनेक चांगल्या पॉलिसी चालू असल्या तरी पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ही पॉलिसी तुमच्यासाठी खूप खास आहे.

Ahmednagarlive24 Office