Post retirement plan : रिटायरमेंटनंतरचे आयुष्य चिंतामुक्त हवे असेल तर, आतापासूनच करा ‘या’ गोष्टींचे नियोजन !

Sonali Shelar
Updated:
Post retirement plan

Post retirement plan : निवृत्तीनंतर तुम्हाला कसे आयुष्य जाग्याचे आहे हे तुमच्या आत्ताच्या निर्णयावरून ठरते, म्हणजे जर तुम्ही निरवृत्तीचा विचार करून आतापासूनच स्वतःसाठी योजना आखत असाल तर ते तुम्हाला भविष्यात फायद्याचे ठरते. निवृत्तीनंतर आरामात आणि मनासारखे आयुष्य जगण्यासाठी गुंतवणूक फार महत्वाची आहे, तुम्ही तुमच्या निवृत्तीचा विचार करून आतापासून गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर जगणे फार सोपे होऊन जाईल.

आतापसूनच तुम्ही तुमच्या निवृत्तीचे नियोजन केले तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींना समोरे जावे लागणार नाही. आज आम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत हे सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला निवृत्तीनंतरचे आयुष्य अगदी आरामात जगता येईल.

योग्य हेल्थकेअर पॉलिसी निवडा

सेवानिवृत्त लोकांचा आरोग्यावरील खर्च अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. यामध्ये जीवनशैली (धूम्रपान/अल्कोहोल), कौटुंबिक इतिहास आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या परिस्थितींचा समावेश असतो, अशा स्थितीत तुम्ही तुमच्यासाठी चांगली हेल्थकेअर पॉलिसी खरेदी करणे फार महत्वाचे आहे. पण हेल्थकेअर पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, विविध प्रकारची उत्पादने आणि त्यांच्याशी संबंधित फायदे समजून घेणे आपल्यासाठी शहाणपणाचे ठरेल. अशी पॉलिसी आदर्श असेल, ज्यामध्ये डॉक्टरांचे सल्ला शुल्क आणि ओपीडी शुल्क देखील समाविष्ट असेल. या व्यतिरिक्त, आपण नेटवर्क रुग्णालयांची यादी देखील पहावी. आणि मग योग्य पोलीस निवडावी.

योग्य गुंतवणूक

निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी तुमची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रणनीती बनवावी लागेल. सर्वप्रथम तुम्हाला इमर्जन्सी फंडासाठी पैसे बाजूला ठेवावे लागतील. हा पैसा फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरावा. त्यानंतर तुमच्यासाठी मोठा निवृत्ती निधी तयार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळेल. यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक, बाँड आणि मुदत ठेवी यांचा समावेश करू शकता. जर तुम्हाला या गोष्टींमध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही आर्थिक सल्लागाराची देखील मदत घेऊ शकता. तुम्ही कुठे पैशांची गुंतवणूक करताय हे फार महत्वाचे आहे. कारण त्यावरच तुमचे भाविषय कसे असेल हे ठरते, म्हणूनच गुंतवणूक करताना बऱ्याच गोष्टींचा विचार करून करा.

कर दायित्वाची देखील काळजी घ्या

तुम्हाला तुमच्या कर दायित्वाची देखील काळजी घ्यावी लागेल. जास्तीत जास्त कर लाभ घेणे तुमच्यासाठी शहाणपणाचे ठरेल. आयकराच्या कलम 80D अंतर्गत, वृद्ध लोक मेडिक्लेम पॉलिसीच्या प्रीमियमवर वार्षिक 50,000 रुपयांच्या कपातीचा दावा करू शकतात. तुम्ही पेन्शनच्या उत्पन्नावर वार्षिक 50,000 रुपयांच्या कपातीचा दावा करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीच्या नियोजनात त्या गुंतवणुकीची वाहने समाविष्ट करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये परिपक्वता रक्कम कराच्या कक्षेत येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe