Investment Tips : दुप्पट परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत आताच करा गुंतवणूक

Content Team
Published:
Investment Tips

Investment Tips : आज मार्केटमध्ये अनेक गुंतवणूक योजना आहेत, ज्या तुम्हाला जास्त व्याज देतात, पण या योजना पैशांची सुरक्षितता देतीलच असे नाही. अशातच जर तुम्ही सुरक्षित योजना शोधता असाल तर पोस्टाच्या योजना तुमच्यासाठी फायद्याच्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजना तुम्हाला फक्त सुरक्षितता देत नाहीत तर तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा देखील देतात.

आज आपण अशाच एका स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातून तुम्ही दुप्पट पैसे कमवाल. किसान विकास पत्र (KVP) योजना सध्या 7.5 टक्के दराने वार्षिक व्याज देत आहे. किसान विकास पत्र योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एकरकमी गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्ही निश्चित कालावधीत तुमचे पैसे दुप्पट करू शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा मोठ्या बँकांद्वारे या योजनेत गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक1000 असू शकते. तथापि, जर तुम्हाला अधिक गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. ही योजना वार्षिक ७.५ टक्के दराने परतावा देते. गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये त्याचे व्याजदर 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आले होते. पूर्वी या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी 120 महिने लागायचे, परंतु आता 115 महिन्यांत म्हणजे 9 वर्षे आणि सात महिन्यांत पैसे दुप्पट होतील.

तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवल्यास, वार्षिक 7.5 टक्के दराने परतावा दिला जाईल. गणनेनुसार, पैसे दुप्पट होण्यासाठी 115 महिने प्रतीक्षा करावी लागेल. म्हणजेच तुमचे पैसे 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होतील. जर तुम्ही एकरकमी 6 लाख रुपये गुंतवले तर ही रक्कम या कालावधीत 12 लाख रुपये होईल.

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल तर तुम्ही किसान विकास पत्र खाते सिंगल आणि संयुक्त खात्यात उघडू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत तीन लोक संयुक्त खाते उघडू शकतात. तथापि, या योजनेअंतर्गत नॉमिनी जोडणे अनिवार्य आहे. तुम्ही इच्छित असल्यास, तुम्ही हे खाते 2 वर्षे आणि 6 महिन्यांनंतर बंद करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe