High Return On FD : बरेच लोक आपली छोटी बचत मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. मुदत ठेवींमध्ये गुंतवणूकदाराला वर्षाच्या शेवटी निश्चित परतावा मिळतो. यामधील परतावा इतर अनेक योजनांपेक्षा कमी असला तरी गुंतवणूकदारांचा एफडीवर विश्वास आहे.
पण सध्या अशा अनेक बँका आहेत ज्या एफडीवर 9 टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा देत आहेत. हा परतावा बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहे. पण लक्षात घ्या बँका वेळोवेळी FD वर व्याज बदलत राहतात.
सर्वाधिक परतावा देणाऱ्या बँका :-
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
ही बँक 5 वर्षांच्या गुंतवणुकीसह एफडीवर 9.01 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.25 टक्के व्याजदर आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
ही बँक 1001 दिवसांच्या मुदतीच्या FD वर वार्षिक 9 टक्के दराने व्याज देत आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
ही बँक ज्यांचा परिपक्वता कालावधी 15 महिने आहे अशा FD वर 8.5 टक्के व्याज देत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
8 टक्क्यांहून अधिक व्याज देणाऱ्या बँकांच्या यादीत या बँकेचाही समावेश आहे. ही बँक 444 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 8.5 टक्के दराने व्याज देत आहे.
AU Small Finance Bank
ही बँक FD वर 8 टक्के दराने व्याज देत आहे. तथापि, हे व्याज 15 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर आहे.
FD मध्ये गुंतवणूक केल्यावर, आयकर (IT) च्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची वार्षिक सूट उपलब्ध आहे. जर तुम्ही शॉर्ट टर्म एफडी केली तर तुम्हाला त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल. हे व्याज तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाते. अशा प्रकारे, ज्या टॅक्स स्लॅबमध्ये उत्पन्न येते त्यानुसार कर भरावा लागेल. जर तुम्हाला 80C चा लाभ घ्यायचा असेल आणि व्याजावर कर भरायचा नसेल, तर 5 वर्षांच्या मुदतीसह FD मध्ये गुंतवणूक करा. याला टॅक्स सेव्हिंग एफडी असेही म्हणतात
एफडीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएसही कापला जातो. जर तुम्हाला एका वर्षात 40 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर तुम्हाला 10 टक्के टीडीएस भरावा लागेल. हा टीडीएस बँकेच कापते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत काहीशी शिथिलता आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत 50 हजार रुपयांपर्यंत आहे.