आर्थिक

1 वर्ष कालावधीची एफडी करून मिळवायचा असेल जास्त पैसा तर ‘या’ तीन बँक देतात सर्वात जास्त व्याज! वाचा बँकांची यादी

Published by
Ajay Patil

Bank FD Interest Rate:- एफडी अर्थात मुदत ठेव हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून ओळखला जातो व मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार एफडी याच गुंतवणूक पर्यायाची निवड करतात. सरकारी किंवा खाजगी बँक असो प्रत्येक बँकेच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना ऑफर केल्या गेल्या असून एफडीच्या कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर बँकांच्या माध्यमातून दिले जातात.

त्यामध्ये सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंत कोणताही कालावधी एफडी करीता निवडता येतो. परंतु कमी वेळेमध्ये जर चांगला नफा किंवा परतावा मिळवायचा असेल तर एक वर्षाची एफडी हा एक चांगला पर्याय ठरतो.

या दृष्टिकोनातून जर आपण देशातील काही प्रमुख खाजगी बँका बघितल्या तर त्या एका वर्षाच्या एफडीवर आकर्षक असे व्याज देत आहेत. त्यापैकी काही बँक आठ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत असून त्या बँका नेमक्या कोणत्या आहेत? त्याचीच माहिती आपण या लेखात थोडक्यात बघू.

एक वर्षे एफडीवर या बँक देतात सर्वात जास्त व्याज

1- बंधन बँक- खाजगी क्षेत्रातील ही एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी बँक असून या बँकेचे मोठ्या प्रमाणावर खातेधारक आहेत. बंधन बँक ही एक वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकाला 8.05% इतके व्याज सध्या देत आहे.

तर ज्येष्ठ नागरिकांना 8.55% व्याजदर बंधन बँकेच्या माध्यमातून दिले जात असून 13 सप्टेंबर 2024 पासून हे व्याजदर लागू झाले आहेत.

2- डीसीबी बँक- डीसीबी बँकेच्या माध्यमातून देखील एक वर्ष कालावधीच्या एफडीवर म्हणजेच मुदत ठेवींवर उत्तम असे व्याज दिले जात आहे. डीसीबी बँक बारा महिने ते पंधरा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या

एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7.50% इतके व्याज देत असून ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधी करिता आठ टक्के इतका व्याजदर देत आहे. अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.25% इतका व्याजदर एक वर्षाच्या एफडीवर डीसीबी बँक देत आहे.

3- इंडसइंड बँक- इंडसइंड बँक ही देखील खाजगी क्षेत्रातील एक लोकप्रिय व मोठ्या संख्येने खातेधारक असलेली बँक असून ही बँक देखील मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर ऑफर करते.

ही खाजगी क्षेत्रातील बँक एक वर्षाच्या एफडीवर आकर्षक परतावा देत असून सामान्य नागरिकांना एक वर्ष ते एक वर्ष तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेव अर्थात एफडीवर 7.75 टक्के व्याज सध्या देत असून याच कालावधी करिता जर ज्येष्ठ नागरिकांनी एफडी केली तर त्यांना 8.25 टक्के इतका व्याजदर इंडसइंड बँक देत आहे.

Ajay Patil