LIC policy : जर तुम्हाला सुरक्षितता आणि तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही LIC च्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. LIC देशातील नागरिकांसाठी उत्कृष्ट पेन्शन योजना राबवत आहे. जे नागरिकांना त्यांच्या भावी आयुष्यात मदत करत आहे.
अशातच तुम्हालाही एलआयसीमध्ये गुंतवणूक करून तुमचे भावी आयुष्य सुरक्षित करायचे असेल, तर आज आम्ही एलआयसीच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यात गुंतवणुक केल्याने तुम्हाला खूप चांगला परतावा मिळेल. आम्ही सध्या LIC सरल पेन्शन योजनेबद्दल बोलत आहोत.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने ही पॉलिसी विशेषतः पेन्शनसाठी सुरू केली आहे. विशेषत: त्या लोकांसाठी जे काम करतात आणि ज्यांना नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळत नाही. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्ही तुमचे म्हातारपणीचे आयुष्य अगदी आरामात जगू शकतात.
भारतीय आयुर्विमा महामंडळाची ही पॉलिसी आजच्या काळातील सर्वात खास पॉलिसी बनली आहे. एखाद्या व्यक्तीला विशेष उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल तर तो येथे गुंतवणूक करून पेन्शनची व्यवस्था करू शकतो.
ज्यासाठी तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल. या योजनेत एकल व्यक्ती एलआयसी सरल पेन्शन पॉलिसीमध्ये मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा गुंतवणूक करू शकते आणि वार्षिक पेन्शनची व्यवस्था करू शकते.
एलआयसी सरल पेन्शन पॉलिसी लोकांना त्यांच्या वृद्धावस्थेत म्हणजे ६० वर्षांच्या निवृत्तीच्या वेळी पेन्शनचा लाभ देते. यामध्ये तुम्हाला दरमहा 12 हजार रुपये पेन्शनचा लाभ दिला जातो. याशिवाय या पेन्शन पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना 6 महिन्यांनंतर कर्ज घेण्यासारख्या सुविधांचा लाभही मिळते.
तुमचे वय 42 वर्षे असल्यास LIC सरल पेन्शन पॉलिसीमध्ये तुम्ही 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी करत असाल तर तुम्हाला 12,388 रुपये मासिक पेन्शन मिळेल.
याद्वारे तुम्ही मासिक पेन्शन किमान 1,000, त्रैमासिक पेन्शन किमान 3,000, सहामाही पेन्शन किमान 6,000 आणि वार्षिक पेन्शन किमान 12,000 चा पर्याय निवडू शकता. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त पेन्शन रकमेची मर्यादा नाही.