आर्थिक

व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फायदेशीर बनवायचे असेल तर ‘या’ गोष्टींकडे दया विशेष लक्ष! नाहीतर फायदा तर दूरच परंतु होईल नुकसान

Published by
Ajay Patil

Tips Of Business Loan:- बऱ्याच जणांना व्यवसाय सुरू करायचा असतो किंवा आहे त्या व्यवसायामध्ये वाढ करायची असते. अशा पद्धतीने व्यवसायाच्या संबंधित जर तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला साहजिकच त्याकरिता पैसा लागतो. मग अशा वेळी जर पुरेसा पैसा आपल्याकडे नसेल तर आपण कर्जाचा मार्ग स्वीकारतो.

याकरिता आपण बँक किंवा इतर नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेतो व व्यवसाय सुरू करतो किंवा आहे त्या व्यवसायात वाढ करतो. परंतु अशा प्रकारे कर्ज घेताना मात्र नियोजन उत्तम असणे खूप गरजेचे असते.

जर कर्ज घेताना नियोजन चुकले तर मात्र या दृष्टिकोनातून कठीण परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हाला जर व्यवसाय कर्ज घ्यायचे असेल तर मात्र काही गोष्टी तपासून घेणे किंवा काही गोष्टींची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे असते. जेणेकरून तुम्ही घेतलेले कर्ज तुम्हाला फायद्याचे ठरेल.

व्यवसाय कर्ज म्हणजेच बिजनेस लोन घेताना या गोष्टींची घ्या काळजी

1- बाजारपेठेचा रिसर्च करा- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर त्या अगोदर तुम्ही बाजारपेठ म्हणजेच मार्केटचा रिसर्च करणे गरजेचे आहे. आपल्याला माहिती आहे की सध्या बँक असो किंवा कर्ज देणारी एखादी संस्था यांचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. त्यामुळे आपण या दृष्टिकोनातून थोडा रिसर्च करणे खूप गरजेचे आहे.

या रिसर्चमुळे तुम्हाला कोणत्या बँकेतून कमी व्याजदरात कर्ज मिळेल हे कळते व त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकतात. नेहमी कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या बँकेकडून कर्ज घ्यावे.

तसेच तुम्ही ज्या संस्थेकडून कर्ज घेत आहात ती सरकारी आहे की खाजगी हे देखील पाहणे गरजेचे आहे. कोणती संस्था किंवा बँक तुम्हाला कोणत्या व्याजदराने आणि कोणत्या अटीवर कर्ज देत आहे हे तपासून पहावे.

2- स्वतःचा सिबिल स्कोर तपासा- कर्जासाठी अर्ज केला तर प्रथम बँक तुमचा सिबिल रिपोर्ट तपासत असते व यावरून तुमची आर्थिक स्थिती कशा पद्धतीची आहे याचा अंदाज बँकांना येतो. आपल्याला माहित आहे की सिबिल रिपोर्ट वरून तुम्हाला कर्ज मिळेल किंवा नाही हे बँक ठरवत असतात.

म्हणून अर्ज करण्यापूर्वी तुम्ही तुमचा सिबिल रिपोर्ट चेक करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अगोदर जर तुम्ही कर्ज घेतले असेल आणि त्याचा ईएमआय भरायला तुम्हाला उशीर झाला असेल तर तुमचा सिबिल स्कोर घसरू शकतो व त्यामुळे तुम्हाला नवीन कर्ज मिळणे कठीण होते. याकरिता अर्ज करण्याअगोदर तुम्ही स्वतःचा सिबिल स्कोर नीट राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे.

3- घेत असलेल्या कर्जाचा व्याजदर समजून घ्या- तुम्हाला कर्ज घेण्यापूर्वी त्या कर्जाचा व्याजदर नेमका किती आहे हे तपासणे खूप गरजेचे आहे. कर्ज म्हटले म्हणजे त्यावर तुम्हाला व्याज हे तर द्यावेच लागणार आहे. पण ते किती आणि कसे आहे हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे.

जेणेकरून कर्जाची परतफेड करताना जास्त व्याजदराचा आर्थिक ताण तुमच्यावर येणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी कुठल्या बँकेत किती व्याजदर आहे हे तपासून मगच अर्ज करावा. यामध्ये बऱ्याचदा तपास न करता कर्ज घेतले जाते व व्यक्ती जास्त व्याजदरामुळे कर्जाच्या जाळ्यात अडकते व नाहक बँकेला जास्त पैसे मोजत बसते.

त्यामुळे कुठूनही कर्ज घेताना अगोदर त्यासाठी असणारे व्याजदर पाहून घेणे गरजेचे आहे.तरच कर्जासाठी पुढे जावे. नाहीतर दुसऱ्या पर्यायाचा अवलंब करावा.

4- कर्जाच्या प्री पेमेंटचे नियम- बरेचदा आपण कर्ज घेण्याच्या नादात कागदपत्र नेमके वाचत नाहीत. या कागदपत्रांवर नेमके बँकांच्या अटी व शर्ती दिलेल्या असतात व त्या न वाचल्याने पुढे गोंधळ होऊ शकतो. बँक व्यवसायिकांना अनेक आकर्षक अशा ऑफर देत असतात व ऑफर्समध्ये आपण गुंतून जातो.

परंतु अशा ऑफर सोबत काही अटी देखील असतात त्याकडे आपले साफ दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत जेव्हा आपण व्यवसायामध्ये चांगला नफा मिळवतो. तेव्हा बरेच जण एकाच वेळी कर्ज परतफेड करण्यासाठी प्रयत्न करता. परंतु अशावेळी जर एकाच वेळी कर्जाची परतफेड करायची असेल तर प्री पेमेंट शुल्क भरावे लागते.

प्री पेमेंट शुल्क म्हणजे कर्ज परतफेडीच्या कालावधी अगोदर कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यावर जे शुल्क आकारले जाते त्याला म्हणतात. अशावेळी प्री पेमेंट शुल्क किती आहे किंवा ते लागणार की नाही याची खात्री अगोदरच करून घेतलेली बरी.

5- कर्ज परतफेडीचा कालावधी किंवा अंतिम मुदत तपासणे- अनेकदा आपल्याला व्यवसायासाठी पैसा लागत आहे म्हणून आपण झटपट मिळणारे कर्ज घेतो व अशावेळी मात्र कर्जाच्या परतफेडीचा कालावधी किती आहे हे पाहणे विसरतो. कारण कर्ज घेण्यामध्ये कर्ज परतफेडीची कालमर्यादा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.

यामध्ये हा कालावधी कमी असू शकतो किंवा खूप जास्त कालावधीचा देखील असू शकतो. परंतु या कालावधीचा परिणाम हा व्याजदरावर होत असतो.

कर्जफेडीचा कालावधी जास्त असेल तर व्याजदर वाढतात आणि पर्यायाने प्रत्येक महिन्याची परतफेडची रक्कम देखील वाढते व त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो. त्यामुळे कर्ज घेण्याअगोदर कालमर्यादा किती आहे हे निश्चित करून घेणे गरजेचे आहे.

Ajay Patil