आर्थिक

एफडी करायची तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये केलेली ठरेल फायद्याची! बँक ऑफ महाराष्ट्रने व्याजदरात केली सुधारणा; जाणून घ्या नवीन व्याजदर

Published by
Ajay Patil

Bank Of Maharashtra FD Interest Rate:- मुदत ठेव योजना म्हणजेच फिक्स डिपॉझिट योजना या देशातील जवळपास सर्व बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक योजना बँकांच्या माध्यमातून ऑफर केल्या जातात

एफडी केल्यावर जो काही व्याजदर मिळतो हा तुम्ही किती कालावधीसाठी एफडी केली आहे यावर प्रामुख्याने अवलंबून असल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच प्रत्येक बँकांचे व्याजदर देखील कालावधीनुसार आणि जेष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपात दिला जातो. याबाबत जर आपण बँक ऑफ महाराष्ट्राच्या अनुषंगाने बघितले तर या बँकेने त्याच्या मुदत ठेवी व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे.

आता बँक ऑफ महाराष्ट्र सात वर्ष ते दहा वर्षापर्यंतची एफडी सर्वसामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना देत असून बँकेने सुधारित केलेले व्याजदर 14 नोव्हेंबर 2024 पासून लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या लेखात आपण बँक ऑफ महाराष्ट्र ने सुधारित केलेले नवीन व्याजदरांची माहिती या लेखात बघू.

बँक ऑफ महाराष्ट्र स्पेशल एफडी व्याजदर
दोनशे दिवसांच्या एफडीवर 6.90%, चारशे दिवसांच्या एफडीवर 7.10% तर 777 दिवसांच्या एफडीवर 7.75% इतक व्याजदर आता दिला जाईल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले सुधारित व्याजदर
बँक ऑफ महाराष्ट्रने ज्येष्ठ नागरिकांसाठी 2.75% ते 7.85% वार्षिक व्याजदर निश्चित केले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राच्या या विशेष एफडी अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतात ज्यांना सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळवायचा आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडीवर मिळणारे सुधारित व्याजदर पाहिले तर ते दोनशे दिवसांच्या एफडी करिता 7.40%, 333 दिवसांच्या एफडीवर 7.85%, चारशे दिवसांच्या एफडीवर 7.60% आणि 777 दिवसांच्या एफडीवर 7.75 टक्के इतका व्याजदर आता मिळेल.
कालावधीनुसार बँक ऑफ महाराष्ट्राच्या एफडीवरील सुधारित व्याजदर

1- सात दिवस ते 30 दिवसांची एफडी- सामान्य लोकांसाठी 2.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 2.75 टक्के

2- 31 दिवस ते 45 दिवस- सामान्य लोकांकरिता तीन टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन टक्के

3- 46 दिवस ते 90 दिवस- सामान्य लोकांकरिता 4.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांकरिता 4.75%

4- 91 दिवस ते 119 दिवस- सामान्य लोकांसाठी पाच टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.50%

5- 120 दिवस ते 180 दिवस- सामान्य लोकांसाठी 5.25% तर जेष्ठ नागरिकांसाठी 5.75%

6- 181 दिवस ते 270 दिवस- सामान्य लोकांसाठी 5.75 तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सहा टक्के

7- २७१ दिवस ते 364 दिवस- सामान्य लोकांकरिता 5.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सहा टक्के

8- 365 दिवस किंवा एक वर्ष- सामान्य लोकांसाठी 6.75 टक्के तर जेष्ठ नागरिकांसाठी 7.25%

9- एक वर्ष ते दोन वर्षापेक्षा कमी- सामान्य लोकांकरिता 6.50% तर जेष्ठ नागरिकांसाठी सात टक्के

10- दोन वर्षे ते तीन वर्षापेक्षा कमी- सामान्य लोकांकरिता 6.50% तर जेष्ठ नागरिकांसाठी सात टक्के

11- तीन वर्ष ते पाच वर्षापेक्षा कमी– सामान्य लोकांकरिता 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सात टक्के

12- पाच वर्षे ते दहा वर्ष- सामान्य लोकांसाठी 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7%
अशाप्रकारे बँक ऑफ महाराष्ट्रने आता सुधारित व्याजदर लागू केले आहेत.

Ajay Patil