आर्थिक

दिवाळीत व्यवसाय सुरू करायचा तर सरकारची ‘ही’ योजना ठरेल फायद्याची! 20 लाख रुपये कर्ज घेतल्यावर भरावे लागतील 13 लाख

Published by
Ajay Patil

Goverment Scheme For Business Loan:- व्यवसाय सुरू करायचे म्हटले म्हणजे तुम्ही छोटा स्तरावर व्यवसाय सुरू करा किंवा मोठ्या स्तरावर त्यासाठी पैसा लागतोच. कारण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करणे गरजेचे असते व गुंतवणूक केल्याशिवाय व्यवसाय सुरू होऊ शकत नाही.

त्यामुळे व्यवसाय करण्याची इच्छा असून देखील बऱ्याच जणांना व्यवसायाची उभारणी शक्य होत नाही.त्यामुळे अशा नव उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात.

या योजनांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते व या माध्यमातून अनुदानाचा लाभ देखील देण्यात येतो. समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योग उभारणीसाठी मदत करणे व बेरोजगारीची समस्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या या योजना महत्त्वाच्या ठरतात.

अशीच एक केंद्र सरकारची महत्त्वाची योजना बघितली तर ती म्हणजे पंतप्रधान रोजगार कार्यक्रम योजना हवे.समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना महत्वपूर्ण आहे.

पंतप्रधान रोजगार कार्यक्रम म्हणजेच पीएमईजीपी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार एक लाखापासून ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. विशेष म्हणजे दिलेल्या या कर्जातून तब्बल 35 टक्क्यांपर्यंत सूट मिळत असते.

 काय आहेत या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये

पंतप्रधान रोजगार कार्यक्रम योजनेअंतर्गत तुम्ही जर वीस लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला सात लाख रुपयांचे अनुदान यावर मिळते. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे 13 लाख रुपये लोन वर तुम्हाला तब्बल सात लाख रुपयांचे सबसिडी दिली जाते.

ही एक पारदर्शक अशी योजना असून संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही योजना राबवत आहे.

 कुणाला घेता येतो या योजनेचा लाभ?

या योजनेअंतर्गत नव्याने स्थापन झालेले जे काही मध्यम उद्योग आहेत त्यांना कर्ज दिले जाते. जुने उद्योग असतील तर त्यांचे नुतनीकरण आणि त्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील कर्जाची तरतूद करण्यात आलेली आहे.

या योजनेची मुदत 2026 पर्यंत केंद्र सरकारने वाढवली असून त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना खूप मोठा फायदा या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. पन्नास लाख रुपये पर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत मिळते. तसेच सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना तब्बल 20 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळते.

या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारताना सर्वसामान्य श्रेणीसाठी दहा टक्के गुंतवणूक करावी लागते तर महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि अपंग व्यक्तींकरिता पाच टक्के इतकी गुंतवणूक करावी लागते.

ग्रामीण भागामध्ये जर व्यवसाय स्थापन करायचा असेल तर अशा व्यवसायांना 35 टक्क्यांपर्यंत व शहरी भागातील व्यवसायांना 25% पर्यंत सवलत दिली जाते.

 कसा घ्याल या योजनेचा लाभ?

1- तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम या योजनेची अधिकृत वेबसाईट https://www.kviconline.gov.in/ ला भेट द्यावी लागते.

2- या ठिकाणी गेल्यानंतर अर्जावर क्लिक करावे व ग्रामीण बेरोजगारांच्या बाबतीत kvic मध्ये आणि शहरी बेरोजगारांच्या बाबतीत डीआयसी म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र असे निवडावे लागेल.

3- त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरून अर्जाची प्रिंट घ्यावी आणि आवश्यक कागदपत्र जमा करावेत.

4- अर्ज केल्याच्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला अधिकाऱ्यांकडून याबाबत प्रतिसाद मिळतो व त्यानंतर तुमचा प्रकल्प मंजुरी करिता पुढे पाठवला जातो.

5- या प्रकल्पाकरिता एक महिन्याचे अनिवार्य प्रशिक्षण दिले जाते व प्रशिक्षण ऑफलाइन किंवा ऑनलाईन असू शकते. जेव्हा प्रशिक्षण पूर्ण होते तेव्हा कर्जाचा पहिला हप्ता दिला जातो.

Ajay Patil