SBI Home Loan EMI : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, स्वतःचे घर घेणे खूप महाग झाले आहे. घर खरेदी करण्यासाठी लाखो रुपये एकाच वेळी गोळा करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक बँका आणि NBFC द्वारे प्रदान गृहकर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा विचार करतात. सध्या देशात अनेक बँका गृहकर्ज प्रदान करतात. पण आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या SBI बँकेकडून ऑफर केले जाणाऱ्या गृहकर्जाबद्दल सांगणार आहोत.
SBI बँक सध्या 50 लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देत आहे. जर तुम्ही बँकेकडून 25 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला मासिक EMI किती भरावा लागेल हे आज आम्ही सांगणार आहोत चला तर मग…
सध्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया 9.15 टक्के ते 9.65 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहे. जर तुम्ही SBI चे 50 लाख रुपयांचे गृहकर्ज 25 वर्षांसाठी घेतले तर 9.15 टक्के व्याजदरानुसार तुमचा मासिक EMI 42,475 रुपये असेल.
म्हणजेच, 50 लाखांच्या गृहकर्जावर, तुम्हाला व्याज म्हणून बँकेला अतिरिक्त 77,42,379 रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे, व्याजासह, तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी एकूण 1,27,42,379 रुपये खर्च करावे लागतील.
त्याचप्रमाणे, जर तुम्ही SBI कडून 25 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुमचा मासिक EMI 9.15 टक्के व्याजदराने 25,485 रुपये होईल. त्यामुळे 25 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला व्याजासह एकूण 46,45,427 रुपये बँकेला भरावे लागतील.