FD Interest Rates : HDFC बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! वाचा…

FD Interest Rates

Content Team
Updated:
FD Interest Rates

FD Interest Rates : देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन दर 10 जून 2024 पासून लागू झाले आहेत. या अंतर्गत सर्वाधिक व्याजदर 7.25 टक्के व्याज दिले जात आहे.

बँकेने 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. या कालावधीत सर्वाधिक 7.25 टक्के व्याज दिले जात आहे. HDFC बँक 18 महिने ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर देखील 7.25 टक्के दराने व्याज देत आहे.

तसेच बँक ज्येष्ठ नागरिक एफडीवर सामान्य एफडी दरांपेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज देत आहे. कालावधीनुसार बँकेचे व्याजदर पुढीलप्रमाणे :-

7-14 दिवसांच्या FD वर 3 टक्के व्याज दिले जात आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.50 टक्के

15-29 दिवसांच्या FD वर 3 टक्के व्याज दिले जात आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.50 टक्के

30-45 दिवसांच्या FD वर 3.50 टक्के व्याज दिले जात आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 4 टक्के

40-60 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के व्याज मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5 टक्के

61-89 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के व्याज मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5 टक्के

90 दिवस-6 महिन्यांच्या FD वर 4.50 टक्के व्याज मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5 टक्के

6 महिने 1 दिवस – 9 महिन्यांच्या FD वर 5.75 टक्के दराने व्याज मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6.25 टक्के

9 महिने 1 दिवस – 1 वर्षाच्या FD वर 6 टक्के दराने व्याज मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6.50 टक्के

1 वर्ष – 15 महिन्यांच्या FD वर 6.60 टक्के दराने व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.10 टक्के

15 महिने – 18 महिन्यांच्या FD वर 7.10 टक्के दराने व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.60 टक्के

18 महिने – 21 महिन्यांच्या FD वर 7.25 टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.75 टक्के

21 महिने – 2 वर्षांच्या FD वर 7.00 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.50 टक्के

2 वर्षे 1 दिवस – 2 वर्षे 11 दिवस FD वर 7.15 टक्के दराने व्याज मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.65 टक्के

2 वर्षे 11 महिने – 35 महिन्यांच्या FD वर 7.15 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.65 टक्के

2 वर्षे 11 महिने 1 दिवस – 3 वर्षांच्या FD वर 7.15 टक्के दराने व्याज मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.65 टक्के

3 वर्षे 1 दिवस ते 4 वर्षे 7 महिन्यांच्या FD वर 7.20 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.70 टक्के

4 वर्षे 7 महिने 1 दिवस – 55 महिन्यांच्या FD वर 7.20 टक्के दराने व्याज मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.70 टक्के

4 वर्षे 7 महिने 1 दिवस – 5 वर्षे FD वर 7.20 टक्के दराने व्याज मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.70 टक्के आहे. 5 वर्षे 1 दिवस- 10 वर्षांच्या FD वर 7.00 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.50 टक्के.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe