आर्थिक

स्टेट बँकेत पेन्शन अकाउंट असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बॅंकेने सुरु केल्या ‘या’ खास सुविधा

Published by
Ahmednagarlive24 Office

State Bank News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही डेसातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. अनेक सुविधा या बँकेकडून पुरवल्या जातात. आता जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास ठरू शकते.

स्टेट बँकेने माहिती दिली आहे की, जर तुमचं एसबीआयमध्ये पेन्शन अकाऊंट असेल तर तुम्हाला अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही. काही कामे घरबसल्या सहज करता यावेत यासाठी एसबीआय तुम्हाला बँकिंग सुविधा देत आहे. चला जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती –

जाणून घ्या काय आहे पेन्शन अकाऊंट

कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ते आपले सॅलरी अकाउंट किंवा बचत खाते पेन्शन खात्यात रूपांतरित करू शकतात. ज्यात त्यांना दरमहा पेन्शनची रक्कम जमा होते. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांच्या या खात्यात निवृत्तीचे लाभ आणि मासिक पेन्शन मिळते. जर तुम्ही तुमचे सध्याचे खाते पेन्शन खात्यात रुपांतरित केले तर नवीन खाते सुरु करण्याची व त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज राहत नाही.

लाईफ सर्टिफिकेट

पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करावा लागतो. एसबीआयच्या पेन्शनधारकांना आता ते सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, असे बँकेने म्हटले आहे. बँकेच्या शाखांमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र स्वीकारण्याची सुविधा आहे.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पेन्शनधारक बँक पेन्शन सर्व्हिसेसच्या वेबसाइटद्वारे आधार-आधारित व्हिडिओ लाइफ प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. जीवन प्रमाणपत्रांसाठी डोरस्टेप कलेक्शन सुविधा देखील उपलब्ध आहे.

सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध

एवढेच नव्हे तर पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनची माहिती घ्यायची असेल तर कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यांच्या पेन्शनचा तपशीलही बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तुमची पेन्शन आली की तुम्हाला एसएमएसद्वारे कळवलं जातं.

यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक बँकेत नोंदणीकृत असावा. याशिवाय ईमेल आयडीद्वारे पेन्शन दिल्यानंतर पेन्शनरला त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर दरमहा पेन्शन स्लिप दिली जाते. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून लॉग इन करून ते डाऊनलोड करता येते.

डोरस्टेप आणि इतर सुविधा

बँक हे बँकेच्या पासबुकवर पीपीओ क्रमांक छापते. यामुळे पेन्शन बाबत व इतर माहिती शोधणे सोपे जाते. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक डोरस्टेप बँकिंग सुविधा देखील प्रदान करते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office