पर्सनल लोन घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, देशातील ‘या’ बड्या बँका आकारतात सर्वात कमी व्याज, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Personal Loan : अलीकडे महागाईचा आलेख मोठा वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना आता घर खर्च भागवतांनाच नाकी नऊ येत आहेत. महिन्याकाठी हाती येणारा पगार हा घर खर्च भागवण्यातच संपत आहे. यामुळे आता जर इमर्जन्सी पैशांची गरज भासली तर सर्वसामान्य बँकेचे दरवाजे ठोठावत आहेत. इमर्जन्सी पैशांसाठी आपल्यापैकी अनेकांनी पर्सनल लोन घेतलेले असेल.

तसेच काहीजण पर्सनल लोन घेण्याच्या तयारीत असतील. दरम्यान वैयक्तिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. खरे तर देशातील सर्वच बँका आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज पुरवत असतात. मात्र प्रत्येक बँकेचे वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे भिन्न असते.

अशा परिस्थितीत जर वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर ज्या बँका स्वस्तात वैयक्तिक कर्ज पुरवत आहेत त्यांच्याकडून कर्ज घेणे परवडते. दरम्यान आज आपण देशातील अशा काही बड्या बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या स्वस्त व्याजदरात वैयक्तिक कर्ज पुरवत आहे.

आयसीआयसीआय बँक : प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक देशातील सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत येते. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज ऑफर केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रायव्हेट बँकेकडून आपल्या ग्राहकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी एक लाख रुपयांचे पर्सनल लोन पुरवले जाते.

यासाठी बँकेकडून 10.75% ते 19 टक्क्यांपर्यंतचे व्याज आकारले जाऊ शकते. व्याजदर हा ग्राहकांच्या क्रेडिट स्कोरवर अवलंबून असतो. तसेच आयसीआयसीआय बँक यासाठी प्रक्रिया शुल्क देखील आकारते. वैयक्तिक कर्जासाठी ही बँक अडीच टक्के एवढे प्रक्रिया शुल्क आकारते.

युनियन बँक ऑफ इंडिया : पब्लिक सेक्टरमधील युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना स्वस्तात वैयक्तिक कर्ज ऑफर करते. ही बँक आपल्या ग्राहकांकडून वैयक्तिक कर्जासाठी 9.3% पासून ते 13.4 टक्क्यांपर्यंतचे व्याज वसूल करते. या कर्जासाठी बँकेकडून 0.5 टक्के एवढे प्रक्रिया शुल्क देखील मिळते.

बँक ऑफ इंडिया : जर तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर बँक ऑफ इंडिया देखील तुम्हाला हे कर्ज देणार आहे. ही बँक ग्राहकांकडून वैयक्तिक कर्जासाठी 10.35% ते 14.85% एवढे व्याज आकारात असते.

एचडीएफसी बँक : प्रायव्हेट सेक्टरमधील ही सर्वात विश्वसनीय बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज पुरवले जात आहे. 10.35% ते 21 टक्क्यांच्या व्याजदरावर ही बँक वैयक्तिक कर्ज पुरवत आहे. ही देशातील एक सर्वात सुरक्षित बँक आहे.