Fixed Deposit : खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर मजबूत परतावा देतात. अशातच जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही कोणती बँक तीन वर्षांच्या कालावधीसाठी किती परतावा देत आहे हे सांगणार आहोत.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या FD वर 7.75 टक्के व्याजदर देते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, ही बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर देत आहे. जर तुम्ही आता येथे 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांसाठी गुंतवली तर ती वाढून 1.26 लाख रुपये होईल.
अॅक्सिस बँक
अॅक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर देते. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.
HDFC, ICICI आणि पंजाब नॅशनल बँक
HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देतात. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.
कॅनरा बँक
कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.30 टक्के व्याज देते. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देते आहे. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.
बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक
बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याजदर देतात. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.23 लाख रुपये होईल.
इंडियन बँक
इंडियन बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज देते. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.22 लाख रुपये होईल.