आर्थिक

जिओच्या ग्राहकांचे डाटा संपण्याचे मिटणार टेन्शन! नवीन वर्षात ग्राहकांना फक्त ‘इतक्या’ रुपयात मिळेल वर्षभर अनलिमिटेड 5G डेटा

Published by
Ajay Patil

Jio 5G Unlimited Data Voucher:- देशामध्ये रिलायन्स जिओचे कोट्यावधी युजर्स असून एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या इतर टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये जिओच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. जर आपण एकंदरीत रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लान बघितले तर ते इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत कमी दराचे असल्याने जिओच्या ग्राहकांसाठी हे खूप फायद्याचे ठरते.

जिओच्या माध्यमातून कायमच ग्राहकांसाठी नवनवीन असे प्लान सादर केले जातात. आता इंटरनेटचा जमाना असून या कालावधीमध्ये मोबाईलमध्ये डेटा पॅक असणे खूप गरजेचे असते.

ज्या व्यक्तींचे काम इंटरनेटवर अवलंबून आहे अशाकरिता तर इंटरनेट डेटा असणे खूप गरजेचे असते. अगदी अशाच ग्राहकांसाठी जिओने नवीन वर्षात एक मोठे गिफ्ट आणले असून रिलायन्स जिओने अनलिमिटेड 5G डेटा व्हाउचर जारी केले आहे व या व्हाउचरच्या माध्यमातून ग्राहकांना एक वर्षासाठी अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे.

कुणाला मिळेल या प्लॅनचा फायदा?
हा डेटा प्लान अशा युजर्ससाठी आहे जे आधीपासून जिओचा ऍक्टिव्ह असा प्रीपेड प्लॅन वापरत आहेत. या डेटा व्हाउचर च्या माध्यमातून 5G डेटाची सुविधा ग्राहकांना सहजपणे मिळणे शक्य होणार आहे. 5G डेटा हवा असलेल्या ग्राहकांसाठी जिओचा हा नवीन अनलिमिटेड डेटा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

काय आहेत या अनलिमिटेड 5G डेटा व्हाउचरचे फायदे?
जिओचा हा नवीन अनलिमिटेड 5G व्हाउचर प्लॅन सहाशे एक रुपयांना उपलब्ध आहे व तो एक वर्षाकरिता अमर्यादित 5G डेटाचा फायदा देईल. हा व्हाउचर प्लॅन वापरण्याकरता मात्र ग्राहकाकडे आधीपासून सक्रिय प्रीपेड प्लॅन असणे गरजेचे आहे

व असा प्लॅन आणि रिचार्ज केलेला हवा ज्यामध्ये दररोज किमान दीड जीबी डेटा उपलब्ध होत असेल. त्यांनाच या व्हाउचरचा लाभ मिळू शकणार आहे. हे व्हाउचर ग्राहकांना गुगल प्ले स्टोअर आणि ॲप्पल ॲप स्टोअरच्या माय जिओ ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळू शकते.

हा व्हाउचर प्लॅन ऍक्टिव्ह करण्यासाठी तुमच्याकडे खालीलपैकी एका रिचार्ज चा समावेश असावा
रिलायन्स जिओने सादर केलेले 5G डेटा व्हाउचर ऍक्टिव्ह करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुमच्याकडे सक्रिय प्रीपेड प्लॅन असणे गरजेचे आहे व त्या सक्रिय प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्ही 199,239, 299, 319, 329, 579, 666 तसेच

769 व 899 रुपये यापैकी एका रिचार्ज प्लान आणि रिचार्ज केलेला असणे गरजेचे आहे. तसेच रिलायन्स जिओच्या माध्यमातून आपल्या नवीन 5G व्हाउचर प्लॅनसह युजर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Ajay Patil