Government Employee News : केंद्रीय अर्थसंकल्प येत्या काही दिवसांत सादर केला जाणार आहे. नरेंद्र मोदी सरकार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा करणार असा दावा केला जात आहे.
समाजातील सर्वच घटकातील नागरिकांना केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ना काही दिले जाणार आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना देखील मोठी भेट मिळणार असे सांगितले जात आहे.
आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र असे असले तरी देशातील सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढीची आणि पाच दिवसाच्या आठवड्याची घोषणा होऊ शकते असे बोलले जात आहे.
Bank कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
देशातील सरकारी बँकांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. बँक कर्मचारी ही देशातील एक सर्वात मोठी व्होट बँक म्हणून ओळखली जात आहे. यामुळे या मंडळीला खुश करण्यासाठी आणि आपल्या बाजूने खेचण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.
या संबंधित मंडळींसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत. नवीन वर्षात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढीची घोषणा होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
खरेतर इंडियन बँक असोसिएशन (IBA) आणि इतर बँक युनियन्सने पगारात 17 टक्के वाढ करून वेतन सुधारण्यावर एकमत केले आहे. ही वाढ आर्थिक वर्ष 2021-22 पासून पुढील पाच वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.
तसेच पगारातील ही वाढ 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून या प्रस्तावाला अर्थसंकल्पात मंजुरी दिली जाऊ शकते
अशा चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. यासोबतच बँक कर्मचाऱ्यांच्या कामांचा आठवडा हा पाच दिवसांचा केला जाणार आहे. वास्तविक सध्या देशातील बँक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते.
मात्र आता महिन्यातील सर्वच शनिवारला सुट्टी दिली जाणार आहे. म्हणजेच कामाचा आठवडा हा पाच दिवसांचा केला जाणार आहे. पण या निर्णयाची अंमलबजावणी करतानाच कर्मचाऱ्यांचे सोमवार ते शुक्रवार पर्यंतचे कामाचे तास देखील वाढवले जातील
जेणेकरून ग्राहकांना त्रास सहन करावा लागू नये असे बोलले जात आहे. तूर्तास याबाबतचा निर्णय झालेला नाही मात्र लवकरच याबाबत निर्णय होईल अशी शक्यता आहे.