Income Tax: घरात किती कॅश ठेवता येतो ? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम नाहीतर ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax : आपल्या देशात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार होत आहे. आज लोक घरी बसून डेबिट-क्रेडिट कार्ड आणि UPI च्या मदतीने काही सेकंदात हजारो रुपयांची देवाणघेवाण करत आहे.

मात्र तुम्हाला हे माहिती आहे का देशातील हजारो लोक आज देखील रोख व्यवहारांना प्राधान्य देतात. यामुळे तुम्ही तुमच्या घरात जास्तीत जास्त किती रोख रक्कम ठेवू शकतात याची संपूर्ण माहिती या लेखात आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला मग जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.

घरात किती रोकड ठेवता येईल

इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार तुम्हाला हवी तेवढी रोकड घरात ठेवता येते. पण तुमच्या घरात ठेवलेली रोकड कधी तपास यंत्रणेने पकडली तर तुम्हाला या रोख रकमेचा स्रोत सांगावा लागेल. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले नसतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. यासाठी तुमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे कर विवरणपत्र भरले असल्यास काळजी करण्याची गरज नाही.

दंड होऊ शकतो

जर तुम्ही घरात ठेवलेल्या रोख रकमेचा स्रोत सांगू शकत नसाल तर तपास यंत्रणा तुमच्यावर कारवाई करेल. तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हाला सांगतो की, नोटाबंदीनंतर आयकराने असे सांगितले होते की, जर तुम्हाला अघोषित रोकड मिळाली, तर तुमच्याकडून वसूल केलेल्या रोख रकमेवर 137% पर्यंत कर लावला जाऊ शकतो.

एका वर्षात किती रोकड काढता येते

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याने एकावेळी 50 हजारांपेक्षा जास्त रोख काढले तर त्याला त्याचे पॅन कार्ड दाखवावे लागेल. त्याच वेळी, एका वर्षात 20 लाखांहून अधिक रोख जमा किंवा काढता येऊ शकतात. दोन लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम भरण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड दाखवावे लागेल.

हे पण वाचा :- Smart TV Offers : काय सांगता ! 60 हजारांचा 50 इंच Xiaomi TV मिळत आहे फक्त 25 हजारात ; पहा संपूर्ण डील