आर्थिक

भारतीय नोटांमध्ये कागद नसतो.. ‘या’ एका खास वस्तूपासून बनवले जातात पैसे

Published by
Tejas B Shelar

आपण चलनात १०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा वापरतो. या नोटा जर तुम्ही व्यवस्थित पाहिल्या तर तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील. या सर्व नोटा पाण्यात भिजवून किंवा फिरवून लवकर खराब होत नाहीत.

कोणताही कागद भिजवला किंवा पाण्यात टाकला तर तो खराब होऊ लागतो. पण नोटांचे तसे होत नाही. याचा अर्थ भारतीय चलनात असणाऱ्या नोटांमध्ये कागद वापरला जात नाही
का? चला जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर.

कागदी नोटमध्ये कागद नाही
वास्तविक, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 च्या भारतीय नोटांच्या कागदी चलनात कोणताही कागद नाही. होय, तुम्हाला धक्काच बसला ना? पण हे खरे आहे. या नोटा 100% कापसाचे बनलेले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयनेही याबाबत माहिती दिली आहे. म्हणजेच आपल्याकडे चलनात ज्या नोटा आहेत त्या कागद नाहीत तर त्या कापूस आहेत.

ही आहे कापसाची खासियत
आता कापसाबद्दल थोडं जाणून घेऊयात. खरं तर, कॉटन फायबरमध्ये लेनिन नावाचे फायबर असते. या लेनिनचा उपयोग भारताचे कागदी चलन बनविण्यासाठी केला जातो. याशिवाय गॅटलिन आणि एडहेसिव सॉल्यूशन भारतीय नोटांमध्ये वापरले जाते.

नोटा लवकर खराब होत नाही
नोटा लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ चलनात राहतात. त्याचप्रमाणे हे सर्वांना माहीत आहे की छापताना अनेक प्रकारच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा नोटांमध्ये समावेश केला जातो, ज्यामुळे बनावट नोटांची छपाई रोखता येते.

नोटबंदी
मोदी सरकारने मागे नोटबंदी करून मोठा धाडसी निर्णय घेतला होता. त्यामुळे नकली नोटा रोखण्यात शासनाला यश आले होते. तसेच इतरही अनेक काही गोष्टी होत्या ज्या करणे शासनाला सोयीचे झाले.

परंतु यात सर्वसामान्यांचे मात्र मोठे हाल झाले. अनेक व्यवसायीकांना देखील संकटाना सामोरे जावे लागले होते. आता सध्या ५०, १००, ५०० च्या नवीन छपाईच्या नोटा आहेत. त्यात सरकारने आता २००० रुपयांची नोटाही चलनातून बाद केल्या आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com