Share market : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान शेअर बाजारातील अस्थिरता लक्षात घेता गुंतवणूकदारांनी केवळ स्ट्रॉंग फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये विचारपूर्वक पैसे गुंतवणे शहाणपणाचे ठरेल असे तरी सध्याचे चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या बाजारातील तेजीमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे आता मूल्यांकनाच्या दृष्टीने महाग दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक शेअर्स अजूनही कमी किमतीत आहेत किंवा बऱ्याच काळानंतर कंसोलिडेशन रेंज मधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत.
ब्रोकरेज हाऊस ऍक्सिस सिक्युरिटीजनेही नुकतेच ब्रेकआऊट झालेल्या काही शेअर्सची यादी केली आहे. हे शेअर्स टेक्निकल चार्टवर मजबूत दिसतात आणि भू-राजकीय तणावानंतरही अवघ्या 3 ते 4 आठवड्यांत 15 ते 18 टक्के परतावा देऊ शकतात.
म्हणजेच 1 लाख रुपयांवर 18 हजार रुपये कमावण्याची संधी आहे. यामध्ये L&T Finance Holdings, DLF, Eclerx Services, Mahindra Holidays & Resorts India यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात आकडेवारीत सविस्तर –
Eclerx Services
CMP: 2160 रुपये
Buy Range: 2140-2098 रुपये
Stop loss: 1980 रुपये
Upside: 13%–17%
Eclerx सर्व्हिसेसने वीकली चार्टवर 1970 च्या आसपास मिड टर्म राउंडेड बॉटम पॅटर्न चे मजबूत तेजी बुलिश कॅन्डलसह ब्रेकआउट केले आहे, जे सकारात्मक संकेत आहे. हे ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमवर झाले आहे जे पार्टिसिपेशन वाढण्याचे संकेत आहे. हा स्टॉक लवकरच 2390-2480 ची पातळी गाठी शकतो.
Mahindra Holidays & Resorts India
CMP: 433 रुपये
Buy Range: 432-424 रुपये
Stop loss:402 रुपये
Upside: 12%–16%
Mahindra Holidays ने वीकली चार्टवर 420-390 च्या आसपास मिड टर्म राउंडेड बॉटम पॅटर्न चे मजबूत तेजी बुलिश कॅन्डलसह ब्रेकआउट केले आहे, जे सकारात्मक संकेत आहे. हे ब्रेकआउट चांगल्या व्हॉल्यूमवर झाले आहे जे पार्टिसिपेशन वाढण्याचे संकेत आहे. हा स्टॉक लवकरच 480-495 ची पातळी गाठू शकतो.
DLF Ltd.
CMP: 548 रुपये
Buy Range: 545-535 रुपये
Stop loss: 525 रुपये
Upside: 6%–10%
DLF स्टॉकने डेली चार्टवर 543-514 च्या श्रेणीतून कंसोलिडेशन झोन यशस्वीरित्या ब्रेक केले आहे. वीकली स्ट्रेंथ इंडीकेटर RSI देखील बुलिश मोडमध्ये आहे. स्टॉक लवकरच 570-595 ची पातळी गाठू शकतो.
L&T Finance Holdings
CMP: 137 रुपये
Buy Range: 137-134 रुपये
Stop loss:127 रुपये
Upside: 13%–18%
L&T Finance Holdings स्टॉकने डेली चार्टवर 136-117 च्या श्रेणीतून कंसोलिडेशन झोन यशस्वीरित्या ब्रेक केले आहे. वीकली स्ट्रेंथ इंडीकेटर RSI देखील बुलिश मोडमध्ये आहे. स्टॉक लवकरच 153-160 ची पातळी गाठू शकतो.
(Disclaimer : आम्ही कोणताही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाहीत)